Live Updates: पंढरपुरात बाजी कोण मारणार?, थोड्याच वेळात मतमोजणी होणार सुरू... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, May 2, 2021

Live Updates: पंढरपुरात बाजी कोण मारणार?, थोड्याच वेळात मतमोजणी होणार सुरू...

https://ift.tt/3tbog3U
सोलापूर: पोटनिवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आज मतमोजणीचा दिवस आहे. कोविड स्थितीमुळे मतमोजणी केंद्रावर फक्त १४ टेबलच मांडण्यात आली आहेत. परिणामी मतमोजणी संथगतीने होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अंतिम निकाल यायला रात्रीचे ९ ते १० वाजणार आहेत. पंढरपूर मंगळवेढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात आली. येथे महाविकास आघाडीकडून भालके यांचे पुत्र नशीब आजमावत आहेत तर भाजपकडून समाधान अवताडे यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. या दोघांतच मुख्य लढत होती असे चित्र पाहायला मिळाले होते. ही निवडणूक सत्ताधारी आणि दोघांसाठीही प्रतिष्ठेची आहे. पंढरपूरच्या मतमोजणीचे क्षणाक्षणाचे अपडेट्स येथे जाणून घ्या...