नवी दिल्ली : पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम ही चार राज्य आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूक २०२१ मध्ये मतदारांनी कुणाला कौल दिलाय, हे आज स्पष्ट होणार आहे. सकाळी ८.०० वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांत झालेल्या मतदानामुळे इतर राज्यांपेक्षा या राज्यात निकाल जाहीर होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. पश्चिम बंगाल विधानसभेच्या एकूण २९४ जागांपैंकी २९२ जागांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. तर दोन ठिकाणी मतदान रद्द करण्यात आलं होतं. या ठिकाणी फेरनिवडणूक घेण्यात येईल. पश्चिम बंगालमध्ये वेगवेगळ्या पक्षांना बहुमत मिळवण्यासाठी १४८ चा आकडा पार करावा लागणार आहे. मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाची सगळी तयारी पूर्ण झालीय. LIVE अपडेट :
- तामिळनाडू : तामिळनाडू विधानसभेत एकूण २३४ जागा आहेत. बहुमतासाठी ११८ जागा आवश्यक
- केरळ : केरळ विधानसभेत एकूण १४० जागा आहेत. बहुमतासाठी ७१ जागा आवश्यक
- आसाम : आसाम विधानसभेत एकूण १२६ जागा आहेत. बहुमतासाठी ६४ जागा आवश्यक
- पुदुच्चेरी : पुदुच्चेरीत एकूण ३० जागांवर मतदान पार पडलंय. (तसंच तीन नामित सदस्य) आहेत. पुदुच्चेरीत बहुमतासाठी १७ जागांवर विजय मिळवणं आवश्यक आहे.