अविनाश भोसलेंची मुंबईत गुंतवणूक; दक्षिण मुंबईत डुप्लेक्स फ्लॅटसाठी मोजले १०३ कोटी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, June 15, 2021

अविनाश भोसलेंची मुंबईत गुंतवणूक; दक्षिण मुंबईत डुप्लेक्स फ्लॅटसाठी मोजले १०३ कोटी

https://ift.tt/3vunXlD
मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेल्या मुद्रांक शुल्क सवलतीचा अनेक बड्या गुंतवणूकदारांनी लाभ घेतला आहे. या सवलतीने शहरातील स्थावर मालमत्ता क्षेत्रात शेकडो कोटींची डील झाली आहेत. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक यांनी दक्षिण मुंबईतील नेपियन सी रोडवर एक डुप्लेक्स फ्लॅट खरेदी केला आहे. भोसले यांच्या 'एबी'ज रिअलकॉन एलएलपी या कंपनीने मुंबईत १०३ कोटी ८० लाख रुपयांना खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. ३१ मार्च रोजी या व्यवहाराची नोंद झाली आहे. भोसले यांच्या 'एबी'ज रिअलकॉन एलएलपी या कंपनीने १०३ कोटी ८० लाख रुपयांना स्थावर मालमत्तेची खरेदी केली आहे. नेपियन सी रोडवर सेसन या टॉवरमध्ये ५३ आणि ५४ व्या मजल्यावर डुप्लेक्स फ्लॅट खरेदी केला आहे. या मालमत्तेचे क्षेत्रफळ ७११८ चौरस फूट आहे. टेरेसचे क्षेत्रफळ ३५०७ चौरस फूट आहे. या व्यवहारात ३ कोटी ४० लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क भरण्यात आले आहे. भोसलेंना या टॉवरमध्ये पाच वाहनांच्या पार्किंगचे हक्क मिळाले आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेल्या मुद्रांक शुल्क सवलतीचा अनेक बड्या गुंतवणूकदारांनी लाभ घेतला आहे. राज्य सरकारने जानेवारी २०२१ ते मार्च २०२१ या काळात मुद्रांक शुल्क ५ टक्क्यावरून ३ टक्के केले होते. तसेच व्यवहारांची नोंदणी नंतर करण्यास सरकारने परवानगी दिली होती. त्यामुळे स्थावर मालमता क्षेत्राला चालना मिळाली. याच टॉवरमध्ये आणखी एक मोठा सौदा झाला आहे. एस. एम डायकेम या कंपनीने ५१ आणि ५२ व्या मजल्यावर डुप्लेक्स फ्लॅट घेतला आहे. हा व्यवहार १०३.६५ कोटींना झाला आहे. या मालमत्तेची १४ मे २०२१ रोजी नोंदणी झाली होती. यापूर्वी मलबार हिलमध्ये प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि डीमार्टचे प्रमुख राधाकिशन दमानी यांनी १००१ कोटी रुपयांना एक बंगला खरेदी केला होता. वरळीमधील एका टॉवरमध्ये रहेजा कुटुंबीयांनी ४२७ कोटींना आलिशान फ्लॅट खरेदी केला होता. स्मिता पारेख, अमिताभ बच्चन यांनी अलिकडच्या काळात कोट्यवधींची प्रॉपर्टी खरेदी केली आहे.