मुख्यमंत्री योगींचे निकटवर्ती अनुपचंद्र पांडे निवडणूक आयुक्तपदी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, June 10, 2021

मुख्यमंत्री योगींचे निकटवर्ती अनुपचंद्र पांडे निवडणूक आयुक्तपदी

https://ift.tt/3zfNt1h
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : केडरचे माजी भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकारी यांची केंद्रीय निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे म्हणून काम केलेले पांडे हे मुख्यमंत्री यांचे निकटवर्तीय मानले जातात. बुधवारी त्यांनी पदभार स्वीकारला. सन १९८४च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या अनुपचंद्र पांडे (६२) यांची निवडणूक आयुक्तपदी वर्णी लागली. निवडणूक आयुक्तांसाठी निश्चित करण्यात आलेल्या वयाच्या निकषानुसार फेब्रुवारी २०२४ मध्ये पांडे यांना वयाची ६५ वर्षे पूर्ण केल्यानंतर हे पद सोडावे लागणार आहे. निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन निवडणूक आयुक्त अशी रचना आहे. १२ एप्रिलला मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक आयुक्तांचे एक पद रिक्त होते. राजीव कुमार हे निवडणूक आयुक्त असून त्यांच्या जोडीला आता पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परिणामी पुढीलवर्षी उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये निवडणूक होत असताना निवडणूक आयोगाचा कोरम पूर्ण झाला आहे. प्राचीन इतिहास या विषयात डॉक्टरेट मिळवलेल्या अनुपचंद्र पांडे यांनी ऑगस्ट २०१९पर्यंत उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव म्हणून सेवा बजावली. ते राज्याचे पायाभूत सुविधा व औद्योगिक विकास आयुक्तही होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या चकमक धोरणानुसार उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कथित गुन्हेगारांना चकमकीत ठार केले. ही एक मोठी कामगिरी म्हणून मांडण्याच्या सूचना त्यावेळी पांडे यांनी राज्याच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवून केल्या होत्या. विशेष म्हणजे वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्याने पांडे फेब्रुवारी २०१९ मध्ये सेवानिवृत्त होणार होते, मात्र मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी त्यांना सहा महिने मुदतवाढ दिली होती.