
नवी दिल्ली : गुरुवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात बुधवारी (९ जून २०२१) ९४ हजार ०५२ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर गेल्या २४ तासांत करोनामुळे ६१४८ जणांचा मृत्यू झाला आहे. हा आजवरचा एका दिवसतला सर्वाधिक करोना मृत्यूचा आकडा ठरलाय. बुधवारच्या दिवसात १ लाख ५१ हजार ३६७ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलीय. याचसोबत, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ९१ लाख ८३ हजार १२१ वर पोहचलीय. देशात आत्तापर्यंत २ कोटी ७६ लाख ५५ हजार ४९३ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत. तर सध्या ११ लाख ६७ हजार ९५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर देशातील मृतांची एकूण संख्या ३ लाख ५९ हजार ६७६ वर पोहचलीय.
- एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : २ कोटी ९१ लाख ८३ हजार १२१
- एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : २ कोटी ७६ लाख ५५ हजार ४९३
- उपचार सुरू : ११ लाख ६७ हजार ९५२
- : ३ लाख ५९ हजार ६७६
- करोना लसीचे डोस दिले गेले : २४ कोटी २७ लाख २६ हजार ६९३