'काँग्रेसनं संघर्ष करून देश उभा केला आणि मोदी सरकार आता...' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, June 1, 2021

'काँग्रेसनं संघर्ष करून देश उभा केला आणि मोदी सरकार आता...'

https://ift.tt/3i25Z7c
अहमदनगर: पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपतर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. तर काँग्रेसतर्फे निषेध दिन पाळण्यात आला आहे. नगरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने केली. मोदी सरकारचा सात वर्षांची काळी राजवट असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेवरून ठिकठिकाणी केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. नगरमध्ये आमदार लहू कानडे, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तसेच जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा गांधी पुतळ्यासमोर प्रशासनाच्या नियमांचे पालन करून निदर्शने करण्यात आली. वाचा: यावेळी बोलताना आमदार कानडे म्हणाले, ‘ही सात वर्षांची राजवट देशातील सर्वांत काळी राजवट असून या कालखंडामध्ये देश आणि देशातील नागरिकांना देशोधडीला लावण्याचे काम केंद्रातील मोदी सरकारने केले आहे. सात वर्षांमध्ये मोदी सरकारने देशाला काळोखात ढकलण्याचे काम केले. देशामध्ये पेट्रोलचे भाव भडकले आहेत. डिझेलचे दर वाढले आहेत. गॅसच्या किमती या सामान्य माणसाच्या परवडण्याच्या कक्षेपलीकडे गेलेल्या आहेत. काँग्रेसने संघर्ष करून, चळवळ करून देश उभा केला. जगात प्रतिष्ठा निर्माण केली. अनेक लोकहिताच्या संस्था निर्माण केल्या. या संस्थाच मोडीत काढण्याचे काम मोदी सरकारने केले. नवरत्न कंपन्यांना विकण्याचा सपाटा मोदी सरकारने लावला आहे.’ जिल्हाध्यक्ष काळे म्हणाले की, मोदी सरकारची कार्यपद्धती ही तुघलकी पद्धतीची आहे. करोना संकट काळात सर्वसामान्यांचे कंबरडे मोडण्याचे काम यांनी केले. ऑक्सिजन उपलब्ध करून दिला नाही. इंजेक्शन, औषधे महाराष्ट्राला उपलब्ध करून दिली नाहीत. लसीकरणाच्या बाबतीमध्ये गुजरातला झुकते माप देत तसेच भाजपशासित राज्यांत प्राधान्य दिले गेले. मात्र महाराष्ट्रावर अन्याय करत राजकीय द्वेषातून महाराष्ट्राला पुरेशा लसी दिल्या नाहीत.’ वाचा: जिल्हा काँग्रेसचे समन्वयक ज्ञानदेव वाफारे, ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंत गारदे, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलिल सय्यद, विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते पाटील, महिला सेवादल काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष कौसरताई खान, शहर जिल्हा सचिव मुबिन शेख, शहर जिल्हा सचिव अन्वर सय्यद, शहर जिल्हा सचिव प्रशांत वाघ, शहर जिल्हा सहसचिव गणेश आपरे विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष सुजित जगताप, युवक काँग्रेसचे विशाल घोलप, वैभव कांबळे उपस्थित होते.