नव्या मंत्र्यांना १५ ऑगस्टपर्यंत दिल्लीतच राहण्याच्या सूचनाः सूत्र - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, July 8, 2021

नव्या मंत्र्यांना १५ ऑगस्टपर्यंत दिल्लीतच राहण्याच्या सूचनाः सूत्र

https://ift.tt/2TCCdw9
नवी दिल्लीः केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी संध्याकाळी झाला. एकूण ४३ मंत्र्यांचा शपथविधी ( ) झाला. वेगवगेळ्या राज्यांमधून नेत्यांची निवड करण्यात आली आहे. ज्या राज्यांमध्ये निवडणूक आहे तिथे अधिक लक्ष देण्यात आलं आहे. एकूण १० मत्र्यांनी इंग्रजीत आणि उतर्वरीत ३३ मंत्र्यांनी हिंदीतून पद आणि गोपनियतेची शपथ ( ) घेतली. यानंतर रात्री उशिरा खातेवाटपही जाहीर झाले. आता या नव्या मंत्र्यांना १५ ऑगस्टपर्यंत दिल्लीतच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी मंत्रालयाकडून तयारी करावी. तसंच खासदारांच्या भेटीसाठी एक निश्चित कार्यक्रम तयार करावा. संसदेत आपल्या रॉस्टर ड्युटीवेळी सभागृहात उपस्थित राहणं आवश्यक आहे, अशा सूचना मंत्र्यांना दिल्या गेल्या आहेत. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात बुधवारी १५ कॅबिनेट आणि २८ राज्यमंत्र्यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. शपथग्रहण कार्यक्रम राष्ट्रपती भवनातील अशोक हॉलमध्ये जवळपास दीड तास चालला. सर्व प्रथम महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शपथ घेतली. यानंतर आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी शपथ घेतली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी १२ मंत्र्यांनी पदाचा राजीनामा दिला. या दिग्गज मंत्री रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर यांचाही समावेश आहे. पंतप्रधान मोदींच्या शिफारशीनंतर राष्ट्रपतींनी सर्व १२ मंत्र्यांचे राजीनामे मंजूर केले आहेत.