आमिर आणि किरणच्या घटस्फोटावर ड्रामाक्विन राखी सावंतची वेगळीच प्रतिक्रिया; म्हणाली... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, July 4, 2021

आमिर आणि किरणच्या घटस्फोटावर ड्रामाक्विन राखी सावंतची वेगळीच प्रतिक्रिया; म्हणाली...

https://ift.tt/3AqdQC5
मुंबई : बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता आमिर खानने आणि त्याची दुसरी बायको यांनी ते विभक्त होत असल्याचे शनिवारी जाहीर केले. या दोघांनी संयुक्तरित्या निवेदन प्रसिद्ध करत सर्वांना ही माहिती दिली. या दोघांनी घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वांना मोठा धक्का बसला आहे. आमिर आणि किरण यांचा घटस्फोट झाल्याने ड्रामाक्विन राखी सावंतलाही मोठा धक्का बसला आहे. घराच्या बाहेर पडलेल्या राखीला फोटोग्राफर्सने आमिर आणि किरण घटस्फोट घेत असल्याची बातमी दिली. ती बातमी ऐकून प्रथम राखीचा विश्वासच बसला नाही. परंतु त्यानंतर राखीने तिच्या अंदाजामध्ये यावर प्रतिक्रिया दिली. राखी म्हणाली, ' जेव्हा कुणी नवरा-बायको विभक्त होतात ते ऐकून मला खूप वाईट वाटते. हे दोघे घटस्फोट घेत आहेत, या गोष्टीवर माझा विश्वास बसत नाही. ' राखी पुढे म्हणाली, 'या आधी मी एका मुलाखतीमध्ये म्हटले होते की आमिर यांनी रीना दत्ताला घटस्फोट देत किरणशी लग्न केलेले मला अजिबात आवडले नाही. मला असे वाटते त्यांनी माझे बोलणे फारच गंभीरपणे घेतले आहे.' त्यानंतर राखीने म्हटले की, ' आता अजूनपर्यंत माझेही लग्न झालेले नाही आणि लोक घटस्फोट घेत आहेत. आमिरजी मी अजूनही कुमारीच आहे.... माझ्याबद्दल तुम्ही काय विचार करत आहात...' अशी मजेशीर प्रतिक्रिया तिने व्यक्त केली आहे. ५६ वर्षांच्या आमिर खानने २००५ मध्ये किरण राव बरोबर लग्न केले होते. त्याआधी आमिरने १९८६ मध्ये रीना दत्तासोबत लग्न केले होते. रीना आणि आमिरला जुनैद आणि आइरा ही दोन मुले आहेत. २००२ मध्ये रीना आणि आमिरचा घटस्फोट झाला होता.