नवी दिल्ली : आज (गुरुवारी) सकाळी आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार देशात बुधवारी (७ जून २०२१) ४५ हजार ८९२ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचसोबत देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ३ कोटी ०७ लाख ०९ हजार ५५७ वर पोहचलीय. देशात सध्या ४ लाख ६० हजार ७०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, गेल्या २४ तासांत करोनामुळे ८१७ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. देशातील मृतांची एकूण संख्या ४ लाख ०५ हजार ०२८ वर पोहचलीय. बुधवारी ४४ हजार २९१ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलीय. त्यामुळे करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या २ कोटी ९८ लाख ४३ हजार ८२५ वर पोहचलीय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशातील अॅक्टिव्ह रुग्णांचा दर १.५० टक्के आहे. रिकव्हरी दरात वाढ होऊन हा दर ९७.१८ टक्क्यांवर पोहचलाय. देशात आठवड्याचा सध्या २.३७ टक्के आहे तर दैनिक पॉझिटिव्हिटी रेट २.४२ टक्क्यांवर आहे. सलग १७ व्या दिवशी दैनिक पॉझिटिव्हिटी रेट ३ टक्क्यांच्या खाली असल्याचं दिसून येतंय.
- एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : ३ कोटी ०७ लाख ०९ हजार ५५७
- एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : २ कोटी ९८ लाख ४३ हजार ८२५
- उपचार सुरू : ४ लाख ६० हजार ७०४
- एकूण मृत्यू : ४ लाख ०५ हजार ०२८
- करोना लसीचे डोस दिले गेले : ३६ कोटी ४८ लाख ४७ हजार ५४९