पालघरः तारापूर औद्योगिक क्षेत्रातील भारत केमिकल्स या कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत पाच जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली असून परिस्थिती आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. तारापूर औद्योगित क्षेत्रात असलेल्या भारत केमिकल्स या कारखान्यात भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की परिसरात स्फोटाचे हादरे बसले होते. मात्र, हा स्फोट कशामुळं झाला याचे कारण अद्याप समजू शकले नाही. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलानं तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. वाचाः सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असून या दुर्घटनेत पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना पालघरमधील थुंगा रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. वाचाः वाचाः