अफगाणिस्तानमधून माघार; अमेरिकन सैन्याची वाहने, शस्त्रे तालिबानच्या हाती! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, July 4, 2021

अफगाणिस्तानमधून माघार; अमेरिकन सैन्याची वाहने, शस्त्रे तालिबानच्या हाती!

https://ift.tt/3xjrVPT
काबूल: अफगाणिस्तानमध्ये मागील २० वर्षांपासून दहशतवादाचा खात्मा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमेरिकेने सैन्य माघारीची प्रक्रिया सुरू केली आहे. अमेरिकन लष्कर सैनिकी तळ सोडण्याच्या प्रक्रियेत गोंधळ सुरू असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे अमेरिकन लष्कराची वाहने, शस्त्रास्त्रे हे अफगाण सैन्याऐवजी तालिबानच्या हाती जात असल्याचे म्हटले जाते आहे. 'फोर्ब्स'च्या एका वृत्तानुसार, मागील महिन्यात तालिबानने अमेरिकन सैन्याचे ७०० ट्रक आणि चिलखती वाहनांवर ताबा मिळवला आहे. यामध्ये अमेरिकन लष्कर वापरत असलेले हॉवित्जर तोफ आणि लष्करी वाहन हम्वीजचाही समावेश आहे. तालिबानने अमेरिकन लष्कराच्या वाहनांवर, शस्त्रांवर ताबा मिळवल्याने सरकारी यंत्रणेचे अस्तित्व संपुष्टात आले असल्याचे म्हटले जाते. वाचा: वाचा: अमेरिकेने ही शस्त्रे अफगाण सैन्याकडे सुपूर्द करण्याऐवजी अथवा विक्री करण्याऐवजी अशीच सोडून दिली. अमेरिकन लष्कराची शस्त्रे, लष्करी वाहने हाती आल्यामुळे आणखी मजबूत होण्याची भीती आहे. अमेरिकेने अचानकपणे सैन्य माघारी घेतल्यामुळे अफगाणिस्तानमधील सरकार नावाची यंत्रणा संपुष्टात आली असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले. येत्या काही महिन्यांमध्ये तालिबान काबूलवरही ताबा मिळवू शकतो अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. वाचा: ऑरिक्स ब्लॉगमध्ये प्रकाशित झालेल्या ओपन-सोर्स इन्वेस्टिगेटिव वृत्ताचे लेखक स्टिजन मित्जर आणि जोस्ट ओलीमंस यांनी सांगितले की तालिबानने काही छायाचित्रे प्रकाशित केली आहेत. त्यामध्ये अमेरिकन लष्कराची वाहने, शस्त्रे दिसत आहेत. तालिबानच्या हाती ७१५ हलकी वाहने लागली आहेत. या वृत्तात तालिबानकडे मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आणि वाहने असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वाचा: तालिबानकडे ही वाहने चालवण्यासाठी मुबलक प्रमाणात इंधन उपलब्ध झाल्यास आणि शस्त्रांसाठी दारूगोळा मिळाल्यास तालिबान अनेक देशांच्या सैनिकांच्या तोडीचे होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.