
नवी दिल्ली : आज (शनिवारी) सकाळी आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार देशात शुक्रवारी (२ जुलै २०२१) ४४ हजार १११ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचसोबत देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ३ कोटी ०५ लाख ०२ हजार ३६२ वर पोहचलीय. देशात सध्या ४ लाख ९५ हजार ५३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, गेल्या २४ तासांत करोनामुळे ७३८ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. देशातील मृतांची एकूण संख्या ४ लाख ०१ हजार ०५० वर पोहचलीय. शुक्रवारी ५७ हजार ४७७ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलीय. त्यामुळे करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या २ कोटी ९६ लाख ०५ हजार ७७९ वर पोहचलीय. भारतात तब्बल ९७ दिवसानंतर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या पाच लाखांहून कमी झाल्याचं समोर येतंय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशातील अॅक्टिव्ह रुग्णांचा दर १.६२ टक्के आहे. वाढून ९७.०६ टक्क्यांवर तर दैनिक २.३५ टक्के आहे.
- एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : ३ कोटी ०५ लाख ०२ हजार ३६२
- एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : २ कोटी ९६ लाख ०५ हजार ७७९
- उपचार सुरू : ४ लाख ९५ हजार ५३३
- : ४ लाख ०१ हजार ०५०
- करोना लसीचे डोस दिले गेले : ३४ कोटी ४६ लाख ११ हजार २९१