नवी दिल्लीः करोनावरील लस उत्पादक ( ) कंपनी मॉडर्नासोबत सक्रियतेने काम सुरू आहे, अशी माहिती केंद्र सरकारने शुक्रवारी दिली. मॉडर्नाची लस ( ) कशी आयात केली जाईल? आणि देशात कशा प्रकारे उपलब्ध केली जाईल? यावर काम सुरू असल्याचं केंद्र सरकारने सांगितलं. मॉडर्नाच्या करोनावरील लसीला गेल्या महिन्यात केंद्र सरकारने आपत्कालीन वापारासाठी मंजुरी दिली आहे. मॉडर्नाच्या लसला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. लस भारतात कशी उपलब्ध केली जाईल? आणि देशात तिची आयात कशी होईल? यावर कंपनीशी सक्रियतेने चर्चा सुरू आहे, अशी माहिती नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली. लस उत्पादक जायडस कॅडिलावरही प्रश्न विचारण्यात आला. कंपनीने तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे निष्कर्ष डीसीजीआयकडे सादर केले आहेत. याची शास्त्रज्ञांकडून पडताळणी सुरू आहे, असं पॉल यांनी सांगितलं. जायडसच्या कॅडिलाच्या चाचणीत मुलांचा समावेश करण्यात आला. आता शास्त्रीय प्रक्रियेतून सर्व आकड्यांचे मूल्यांकन केले जाईल. त्यानंतर शिफारशींचे पालन केले जाईल, असं डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले.