चित्रकूटः आतापर्यंत मीडियापासून अतिशय सावध राहणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ( ) हे आता लवकरच इंटरनेटवर सक्रिय झालेले दिसून येतील. आपल्या कार्यक्रमांद्वारे ( ) नागरिकांपर्यंत पोहोचणारे संघाचे बडे पदाधिकारी इंटरनेट मीडियावर किंवा सोशल मीडियावर आहेत. पण आता शाखा स्तरावरील स्वयंसेवकही ( ) सोशल मीडियावर जोडण्यासाठी प्रशिक्षित केले जातील. भाजपच्या आयटी सेल प्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघही उच्च तंत्रज्ञान डिजिटल सूचना संवाद केंद्राची स्थापना केरणा आहे. राष्ट्रीय स्तरापासून ते गावांपर्यंत आपल्या विचारांचा प्रसार शाखांमार्फत किंवा सेवा कार्यांद्वारे करत आला आहे. संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे अधिकारी आणि सदस्यांमधील काही जण इंटरनेट मीडिय किंवा सोशल मीडियावर सक्रिय आहेत. संघाची विचारधारा मानणाऱ्या ५० हून अधिक संघटना सक्रिय आहेत. त्यांच्याशी संबंधित विविध वर्गांच्या नागरिकांपर्यंत ते राष्ट्रवादी विचार आणि विचारसरणी पोहोचवत आहेत. पहिल्यांदाच संघांचे स्वयंसेवक हे इंटरनेट मीडिया माध्यमातून संघाचे विचार हे खुल्या मंचावर मांडतील. तर्कांसह ते आपला मुद्दा समाजात ठेवतील. नागरिकांमधील गैरसमज दूर करतील. यासाठी संघाकडून स्वयंसेवकांना प्रशिक्षणही दिले जाईल. यासोबतच हायटेक डिजिटल सूचना संवाद केंद्रही उभारेल. इंटरनेटवर मीडियावर पसरवल्या जात असलेल्या चुकीच्या गोष्टींना संवाद केंद्राद्वारे उत्तर देण्यासाठी आपल्या डिजिटल व्हॉलिंटियर्सना युक्तिवादासाठी तयार करतील, असं वृत्त जागरणने दिलं आहे. चित्रकूटमध्ये राष्ट्रीय स्वयंसेव संघाची ४ दिवसांची बैठक सुरू करोना काळात स्थलांतरीत मजुरांचे प्रचंड हाल ( ) झाले. संपूर्ण देशाने त्यांचे हाल बघितले. स्थलांतरीत मजुरांसाठी केंद्राने कल्याणकारी योजना आणल्या. पण त्यांना सहन कराव्या लागलेल्या यातना या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सलत आहे. चित्रकूटमध्ये अखिल भारतीय प्रांत प्रचारकांच्या ४ दिवसांच्या बैठकिच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी प्रवासी मंजुरांना रोजगार आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न आणि पुढे नेण्यावर चर्चा झाली. करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपूर्वी बचाव आणि उपचारासंबंधी व्यवस्था करण्यावरही भर देण्यात आला.