गणेशोत्सवासाठी स्पेशल गाड्यांची घोषणा; 'ही' आहे यादी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, July 6, 2021

गणेशोत्सवासाठी स्पेशल गाड्यांची घोषणा; 'ही' आहे यादी

https://ift.tt/3xl947a
म. टा. प्रतिनिधी, करोना तिसऱ्या लाटेच्या धर्तीवर यंदाही गणेशोत्सवावर सरकार कडक निर्बंध लावण्याच्या ठाम मनस्थितीत आहे. यामुळे कोकणासह संपूर्ण गणेशोत्सवावर विरजण पडण्याची शक्यता आहे. अशातच मध्य आणि कोकण रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी ७२ विशेष रेल्वे गाड्या चालवण्याची घोषणा केली. यंदा ही कोकणातील हा केवळ नाममात्र असणार आहे. रत्नागिरी, सिंधूदुर्गसह संपूर्ण कोकणात गणेशोत्सवाच्या आधी साधारण आठ दिवस संचारबंदी लागू होण्याचा अंदाज सूत्रांनी वर्तवला आहे. तूर्त सरकारने कोकणातील उत्सवाबाबत आपले धोरण जाहीर केलेले नाही. असे असतानाही कोकणात जाणाऱ्या गाड्यांमध्ये आरक्षणासाठी चाकरमान्यांनी मात्र धावाधाव सुरू केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि पनवेल येथून सावंतवाडी रोड/रत्नागिरीसाठी विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहे. सीएसएमटी ते सावंतवाडी रोड (रोज ३६ विशेष), सीएसएमटी ते रत्नागिरी द्वीसाप्ताहिक (१० विशेष), पनवेल ते सावंतवाडी रोड आठवड्यातून तीनवेळा (१६ विशेष )आणि पनवेल ते रत्नागिरी (१० विशेष) या मार्गावर या गाड्या धावणार आहेत. ५ ते २९ सप्टेंबरपर्यंत या गाड्या धावतील. अधिक माहितीसाठी मध्य आणि कोकण रेल्वेच्या संकेतस्थळावर संपर्क साधावा. सर्व गाड्यांचे आरक्षण गुरुवार, ८ जुलैपासून सुरू होणार असून प्रवाशांनी प्रवासी आरक्षण केंद्र तसेच आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावरून करता येईल.