अकोला शहराजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कारचा चुराडा, चौघे ठार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, July 9, 2021

अकोला शहराजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कारचा चुराडा, चौघे ठार

https://ift.tt/3wuvfXl
अकोला: शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील रिधोरा येथील रिलायन्सच्या पेट्रोल पंपाजवळ गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास कार आणि ट्रकला भीषण अपघात झाला आहे. त्यात चौघांचा मृत्यू झाला आहे. (Truck-Car Collision on National Highway Near Akola) काल मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अपघातग्रस्त कार (एमएच ३७ बी ८२६२ ) शेगावहून ही कार वाशिमच्या दिशेनं जात होती. या कारला समोरून येणाऱ्या एका ट्रकनं दोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी झालेल्या एका व्यक्तीला उपचारासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. वाचा: धनजंय नवघरे (२१), विशाल नवघरे, (२२) मंगेश नामदेव राऊत (२८) व चालक शुभम कुटे (२३) अशी मृतांची नावे आहेत. हे चौघेही जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील पांगरी (कुटे) येथील आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे चौघे गुरुवारी येथे श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी गेले होते. गुरुवारी त्यांनी दर्शन घेतले आणि ते आपल्या गावाकडे परतत होते. शेगाव सोडल्यानंतर त्यांनी भरधाव वेगाने कार पळवायला सुरुवात केली. शुभम कुटे हा वाहन चालवित होता. राष्ट्रीय महामार्गावर बाळापूर नजीक पुढच्या वाहनाला ओव्हर टेक करण्याच्या प्रयत्नात दोनदा ते बचावले. तरीही त्यांनी कारचा वेग कमी केला नाही. पुढं रिधोरा येथील पेट्रोल पंपाजवळ त्यांनी पुन्हा एकदा एका वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नात त्यांची कार ( एम एच १९ सी वाय ६४०४) समोरून आलेल्या आयशर ट्रकवर धडकली. या घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार दत्तात्रय आव्हाळ आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. अपघातात मृत्यू झालेले सर्व जण वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील पांगरीकुटे येथील रहिवासी आहेत. पुढील तपास बाळापूर पोलीस करत आहे. वाचा: