मुंबई- लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता , बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री यांच्या अभिनयाने सजलेल्या बहुचर्चित '' ची प्रेक्षक प्रचंड आतुरतेने वाट पाहत आहेत. 'केजीएफ' ला मिळलेल्या यशानंतर दक्षिणेतील प्रेक्षकांसह बॉलिवूडच्या प्रेक्षकांमध्येही 'केजीएफ २' चित्रपटाची उत्सुकता पाहायला मिळतेय. प्रेक्षक चित्रपट प्रदर्शनाच्या तारखेकडे डोळे लावून बसले आहेत. अशात 'केजीएफ २' चित्रपटाचा नवं पोस्टर सोशल मीडियावर लीक झालं आहे. 'केजीएफ २' चा नवीन पोस्टर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. यासोबतच 'केजीएफ २' ट्विटरवर ट्रेंड करत होता. चित्रपटाचे तामिळनाडू राज्यातील हक्क ड्रीम हाऊस प्रोडक्शन कंपनीने विकत घेतले आहेत. चित्रपटाच्या पोस्टरवरून या गोष्टीचा खुलासा होत आहे. रवीना टंडन हिने देखील तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. पोस्टर शेअर करत रवीनाने लिहिलं, 'राक्षक तेव्हाच येतो जेव्हा मैदान शत्रूंनी भरलेलं असेल. त्याच्या येण्याच्या नव्या तारखेची घोषणा लवकरच केली जाईल. केजीएफ २' तर 'केजीएफ २' चं आणखी एक पोस्टर एका चाहत्याने ट्विटरवर ट्विट केलं आहे. ज्यात सुपरस्टार यशचा एक अनोखा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. या पोस्टरमध्ये यश राजाप्रमाणे एका खुर्चीत बसला आहे. त्याची वाढलेली दाढी आणि एकाच गोष्टीवर खिळलेली नजर पाहून तो आता कोणत्याही क्षणी शत्रूवर तुटून पडेल असं भासत आहे. तर पाठीमागे आग भडकलेली दिसत आहे. त्याचा तो हटके लुक पाहून चाहते घायाळ झाले आहेत. यशाच्या या लूकचं चाहते भरभरून कौतुक करत आहेत. लवकरच 'केजीएफ २' च्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा होण्याची शक्यता आहे.