भारतासाठी पदकाचा ठोसा; लव्हलिन बोर्गोहेन उपांत्य फेरीत, टोकियोत दुसरे पदक निश्चित - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, July 30, 2021

भारतासाठी पदकाचा ठोसा; लव्हलिन बोर्गोहेन उपांत्य फेरीत, टोकियोत दुसरे पदक निश्चित

https://ift.tt/3zHFPw6
टोकियो: टोकियो ऑलिम्पिकमधील सातवा दिवस भारतासाठी आनंदी ठरला. बॉक्सिंगमध्ये ६९ किलो वजनी गटात झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीत भारताच्या ()ने तैपईच्या निएन चिन चेनचा पराभव करत देशाचे दुसरे पदक निश्चित केले. वाचा- लव्हलिन बोर्गोहेनने निएन चिन चेनवर ४-१ असा विजय मिळवला. ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताचे हे तिसरे पदक ठरले आहे. याआधी २००८ च्या बिजिंग ऑलिम्पिकमध्ये विजेंदर सिंगने कास्य, २०१२मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये मेरी कोमने कास्य पदक जिंकले होते आणि आता लव्हलिने पदक निश्चित केले आहे. आता या पदकाचा रंग कोणता असेल याची सर्वांना उत्सुकता आहे. वाचा- विंजेंदर सिंगने केले अभिनंदन पदकतालिकेत सध्या चीन १६ सुवर्ण, ७ रौप्य आणि १० कास्य पदकासह पहिल्या तर जपान १५ सुवर्ण, ४ रौप्य आणि ७ कास्य पदकासह दुसऱ्या स्थानावर आहे. अमेरिका १४ सुवर्ण, १६ रौप्य आणि ११ कास्य पदकासह तिसऱ्या स्थानावर आहे. भारत एका रौप्य पदकासह ४७व्या स्थानावर आहे.