पाटणाः केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आज संध्याकाळी होण्याची ( ) शक्यता आहे. यापूर्वी संयुक्त जनता दलाचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री ( ) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या विजयानंतर घटकपक्ष असलेल्या जेडीयूने कॅबिनेटमध्ये अपेक्षित संख्येत मंत्रिमद मिळत नसल्याने मंत्रिमंडळात सहभागी होण्यास नकार दिला होता. पण आता नितीशकुमार यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे. २०१९ मध्ये जे घडले ते घडले. आता माननीय पंतप्रधान जे काही निश्चित करतील ते आम्ही स्वीकार करू. जेडीयू अध्यक्ष आरसीपी सिंह यांना भाजपशी बोलणी करण्यासाठी अधिकृतपणे पाठवण्यात आले आहे. यावेळी जेडीयू केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होईल, असं नितीशकुमार म्हणाले. अनुप्रिया पटेल, पंकज चौधरी, रिटा बहुगुणा जोशी, रामशंकर कठेरिया, वरुण गांधी, ज्योतिरादित्य शिंदे, आरसीपी सिंह, लल्लन सिंह, पशुपती पारस, राहुल काँस्वा, सी. पी. जोशी आणि सर्वानंद सोनोवाल यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार हे जवळपास निश्चित झालं आहे. पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारात एकहून अधिक मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणाऱ्या मंत्र्यांवरील कामाजा बोजा कमी केला जाईल. तसंच मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना स्थान देऊन खराब कामगिरी करणाऱ्या काही मंत्र्यांना डच्चू दिला जाऊ शकतो. केंद्रीय मंत्रिमंडळात ८१ मंत्री असू शकतात. पण सध्या फक्त ५३ मंत्री आहेत. आणखी २८ मंत्र्यांची जागा रिक्त आहे. केंद्रातील सत्तेतल्या आपल्या दुसऱ्या सरकारमधील कार्यकाळातील पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळाचा हा पहिला विस्तार आहे.