'जरा तारीख कळवा; आम्ही तुमचं काय फोडू हे कळेल' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, August 1, 2021

'जरा तारीख कळवा; आम्ही तुमचं काय फोडू हे कळेल'

https://ift.tt/3ljpsle
जळगाव: फोडण्याची भाषा करणारे भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेतील आमदार हे शिवसेनेच्या रडारवर आले आहेत. या वक्तव्यामुळं संतापलेले शिवसेनेचे उपनेते व पाणीपुरवठा मंत्री यांनी लाड यांना थेट आव्हानच दिलं आहे. (Gulabrao Patil slams Prasad Lad) 'प्रसाद लाड हे शिवसेना भवन फोडण्याची गोष्ट करताहेत. माझं त्यांना आव्हान आहे, जरा तारीख कळवा. आम्ही तुमचं काय फोडू हे कळेल,' असा इशारा पाटील यांनी दिला आहे. 'राज्यात सत्तांतर होईल अशी अपेक्षा ह्या लोकांना आतापर्यंत होती. पण ते होत नाही हे समजल्यावर काहीतरी करून वातावरण बिघडवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. सगळ्या गोष्टी माहीत असलेल्या लाड यांच्यासारख्या मोठ्या व्यापाऱ्याच्या मुखातून हे शोभत नाही. त्यांची हिंमत असेल तर त्यांनी हा प्रयोग करून बघावा,' असं आव्हानच पाटील यांनी दिलं आहे.