कल्याण सिंहांना श्रद्धांजली; राष्ट्रध्वजावर भाजपचा झेंडा, विरोधकांनी साधला निशाणा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, August 23, 2021

कल्याण सिंहांना श्रद्धांजली; राष्ट्रध्वजावर भाजपचा झेंडा, विरोधकांनी साधला निशाणा

https://ift.tt/2UCQjxO
नवी दिल्लीः उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री यांच्या कल्याण सिंह यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमातील एक फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. कल्याण सिंह यांचे शनिवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. पंतप्रधान मोदींनी रविवारी लखनऊमध्ये त्यांना श्रद्धांजली वाहिली. कल्याण सिंह हे आयुष्यभर जनतेच्या कल्याणासाठी झटले. ते एक सक्षम नेते होते. जनतेच्या विश्वासाचे प्रतीक होते, असं त्यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले. कल्याण सिंह यांच्या अंत्यदर्शनाचा भाजपने ट्वीट केलेला फोटोत कल्याण सिंह यांच्या पार्थिक राष्ट्रध्वज दिसून येत आहे. पण त्याचा निम्मा भाग हा भाजपच्या झेंड्याने झाकला गेल्याचे दिसून येत आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. दुसरीकडे यावरून राजकीय आरोप सुरू झाले आहेत. काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. 'नव्या इंडियात भारताच्या राष्ट्रध्वजावर पक्षाचा झेंडा लावणं ठीक आहे का?', असा प्रश्न युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास यांनी विचारला आहे. भारताच्या राष्ट्रध्वजाचा अपमान सहन केला जाणार नाही, असं युवक काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्वीटर हँटलवरून हिंदीत ट्वीट केलं आहे. समाजवादी पार्टीचे प्रवक्ते घनश्याम तिवारी यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे. 'देशापेक्षा पार्टी मोठी आहे. राष्ट्रध्वजावर पक्षाचा झेंडा. नेहमी प्रमाणे भाजपच. ना खेद, ना पश्चाताप ना कुठलं दुःख', असं तिवारी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या नव्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी दिल्ली रॅली काढली होती. यावेळी लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वजाचा अपमान करण्यात आला होता. आंदोलकांनी लाल किल्ल्याच्या घुमटावर धार्मिक झेंडा लावला होता. राष्ट्रध्वजाचा अपमान खपवून घेणार नाही, असं त्यावेळी केंद्र सरकारने म्हटलं होतं.