अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डात सत्ताबदल; तालिबानी बनला अध्यक्ष - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, August 23, 2021

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डात सत्ताबदल; तालिबानी बनला अध्यक्ष

https://ift.tt/3B7ZK8f
काबूल : अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डात आता मोठा फेरबदल झाला आहे. तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडून पलायन केलं आहे. या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे (एसीबी) माजी प्रमुख अजीजुल्लाह फाजली यांची रविवारी (२२ ऑगस्ट) नियुक्ती करण्यात आली आहे. तालिबानची सत्ता आल्यानंतर देशाच्या प्रशासकीय समितीमध्ये ही पहिलीच नवीन नियुक्ती आहे. वाचा- एसीबीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “एसीबीचे माजी अध्यक्ष अजीजुल्लाह फाजली यांची पुन्हा मंडळाचे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते आगामी स्पर्धांसाठी एसीबीचे नेतृत्व करतील. तसेच मंडळाच्या कार्यवाहीवरही देखरेख ठेवतील. वाचा-वाचा- अजीजुल्लाह फाजली जवळपास दोन दशकांपासून अफगाणिस्तान क्रिकेटशी संबंधित आहेत. आतिफ मशाल यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर फाजली यापूर्वी एसीबीचे अध्यक्ष झाले होते. फाजलीने यापूर्वी सप्टेंबर २०१८ ते जुलै २०१९ पर्यंत एसीबीचे अध्यक्ष म्हणून काम केले होते. त्यांनी पद सोडल्यानंतर फरहान युसूफझाई हे अध्यक्ष झाले होते. देशात खेळाबद्दल विकास करणाऱ्या प्रस्थापित खेळाडींच्या पहिल्या गटात फाजलीचा समावेश होता. त्यांनी एसीबीचे उपाध्यक्ष आणि सल्लागार म्हणूनही काम पाहिले होते. वाचा- वाचा- एसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (मुख्य कार्यकारी अधिकारी) हमीद शिनवारी यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला म्हटले होते की, तालिबान खेळाला पाठिंबा देत असल्याने क्रिकेट स्पर्धांचे वेळापत्रक नेहमीप्रमाणे सुरू राहील, अशी अपेक्षा आहे. वाचा- दरम्यान, काबूल विमानतळावरील सर्व व्यावसायिक उड्डाणे सध्या बंद आहेत. आणि अफगाणिस्तान संघाला पाकिस्तानविरुद्धची मालिका खेळण्यासाठी श्रीलंकेला जावं लागणार आहे. त्यामुळे फाजली यांच्या नियुक्तीनंतर अफगाणिस्तान क्रिकेट संघ श्रीलंका दौऱ्यावर कसा जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.