नियम मोडले! रिझर्व्ह बँंकेची पुण्यातील दोन सहकारी बँंकांवर कारवाई - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, August 27, 2021

नियम मोडले! रिझर्व्ह बँंकेची पुण्यातील दोन सहकारी बँंकांवर कारवाई

https://ift.tt/3jlQaIJ
मुंबई : नागरी सहकारी बँकांकरीता असलेल्या नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने पुण्यातील दोन सहकारी बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेने एका बिगर बँकिंग वित्त संस्थेला (एनबीएफसी) देखील दंड ठोठावला आहे. पुण्यातील जिजामाता महिला सहकारी बँकेला नागरी सहकारी बँकांशी संबंधित नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी ३ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याच प्रमाणे पुण्यातील आणखी एक सहकारी बँक असलेल्या मुस्लीम को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवर २ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे. मुस्लीम को-ऑपरेटिव्ह बँकेने ग्राहकांच्या 'केवायसी'संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याचे रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनात आढळून आले. त्यानुसार कारवाई करण्यात आली. बिगर बँकिंग वित्त संस्था (एनबीएफसी) असलेल्या तामिळनाडू राज्यातील तिरुनेलवेली येथील सेयाद शरियत फायनान्स लिमिटेड या एनबीएफसीला ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ग्राहकांच्या केवायसी संबधी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे. याच महिन्याच्या सुरुवातीला नागरी सहकारी बँकांनी इतर बँकांमध्ये ठेवी ठेवण्यासंदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने नाशिकमधील जनलक्ष्मी को ऑपरेटिव्ह बँकेला ५० लाख ३५ हजारांचा दंड ठोठावला होता. रिझर्व्ह बँकेने ३१ मार्च २०१९ रोजी जनलक्ष्मी को ऑपरेटिव्ह बँकेच्या आर्थिक ताळेबंदाचे परीक्षण केले. त्यात बँकेने इतर बँकेत ठेवी करताना नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. अर्बन को ऑप बँकेकडून इतर बँकेत ठेवी ठेवण्याबाबत रिझर्व्ह बँकेच्या नियमावलीचे उल्लंघन करण्यात आले. तसेच मेंबरशीप ऑफ क्रेडीट इन्फॉर्मेशन कंपनी याबाबत देखील नियमांचे उल्लंघन झाल्याचे रिझर्व्ह बँकेला दिसून आले. त्यामुळे आरबीआयने जनलक्ष्मी को ऑपरेटिव्ह बँकेला ५० लाख ३५ हजारांचा दंड ठोठावला होता.