व्यावसायिकाला लुटण्यासाठी अनोखी शक्कल लढवली; मात्र नंतर प्रकरण अंगलट आलं! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, August 27, 2021

व्यावसायिकाला लुटण्यासाठी अनोखी शक्कल लढवली; मात्र नंतर प्रकरण अंगलट आलं!

https://ift.tt/2XR3SLi
: तुमच्या विरोधात आयकर विभागाकडे तक्रार आल्याचं सांगत एका व्यावसायिकाला ६० लाख रूपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी बांधकाम व्यवसायिकाच्या तक्रारीवरून जवाहर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसंच या प्रकरणात एकाला ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती जवाहर नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी दिली. शहरात बांधकाम व्यवसायिक म्हणून काम करणाऱ्या सुशांत दत्तायत्र गिरी (३५, रा. शिवशंकर कॉलनी) याने दिलेल्या तक्रारीनुसार, ७ ऑगस्ट रोजी त्यांच्या ओळखीच्या संजय पारख या व्यक्तीचा त्यांना फोन आला. त्यांनी तुमची तक्रार आयकर विभागाच्या कार्यालयात आली आहे, अशी खोटी माहिती गिरी यांना दिली. तसंच आयकर विभागाचे अधिकारी अरविंद जवळगेकर ओळखीचे आहेत, तुमची स्टेलमेंट करून देतील असंही या संजय पारखने सांगितलं. या प्रकरणात १० ऑगस्ट रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास बीड बायपास रोडवरील एका हॉटेलमध्ये सुशांत गिरी, संजय पारख, त्यांच्यासोबत अरविंद जवळगेकर आणि महेश चौधरी यांची भेट झाली. संजय पारख याने अरविंद जवळगेकर यांची ओळख आयकर विभागातील अधिकारी अशी करून दिली, तर महेश चौधरी यांची ओळख त्यांचे स्वीय सहाय्यक अशी करून देण्यात आली. या बैठकीत सुशांत गिरी यांना तुमच्यावर दीड ते दोन कोटी रूपयांचा आयकर बुडवल्याचा आरोप असल्याचे सांगण्यात आले. हे ऐकून सुशांत गिरी अवाक् झाले. हे प्रकरण बाहेर मिटवण्यासाठी ६० लाख रूपयांची मागणी करण्यात आली. हे पैसे दिले नाही तर तुम्हाला डी.के. पाटील आत्महत्या प्रकरणात अडकवू, तुम्हाला त्रास देऊ अशीही धमकी दोघांनी दिली. ११ ऑगस्ट रोजी पुन्हा भेट झाली. त्यांना ६० लाख रूपये देऊ शकत नसल्याचे सुशांत गिरी यांनी स्पष्ट सांगितलं. यामुळे चाळीस लाख रूपये देण्याचं ठरलं. हा प्रकार खंडणी उकळण्याचा असल्याची शंका आल्याने सुशांत गिरी यांनी जवाहरनगर पोलीस ठाणे गाठून अरविंद जवळगेकर, महेश चौधरी व संजय पारख या तिघांच्या विरोधात खंडणी, फसवणूक करणे या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. जवाहरनगर पोलिसांनी या प्रकरणात महेश चौधरी याला ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अन्य दोन आरोपींपैकी संजय पारख हा सुशांत गिरी याच्या ओळखीचा असून तो जमीन विक्रीचा व्यवसाय करतो, तर अरविंद जवळगेकर हा इन्शुरन्सचे काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.