राणेंच्या घरासमोर राडा करणाऱ्या पदाधिकाऱ्याचं युवा सेनेत मोठं प्रमोशन - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, August 28, 2021

राणेंच्या घरासमोर राडा करणाऱ्या पदाधिकाऱ्याचं युवा सेनेत मोठं प्रमोशन

https://ift.tt/2WxSQu3
म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील घराबाहेर राडा करणारा सर्वसामान्य कार्यकर्ता मोहसीन शेख याची सहसचिवपदी नेमणूक करण्यात आली आहे. असे करून यांनी त्याच्या पाठीवर एकप्रकारे कौतुकाची थाप दिली असल्याचे बोलले जात आहे. नारायण राणे यांच्या जुहू येथील बंगल्याबाहेर झालेल्या आंदोलनात मोहसीन अग्रेसर होता. यावेळी पोलिसांनी त्याला प्रचंड मारले. यात तो जखमी झाल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले. त्याला पोलिस मारहाण करतानाची क्लिप सोशल मीडियावर पसरली आहे. या आंदोलनानंतर रात्री उशिरा वरुण सरदेसाईंच्या नेतृत्वात युवासेनेच्या मुंबई कार्यकारिणीने शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांची 'वर्षा' येथे भेट घेतली. यावेळी उद्धव यांनी शिवसेना स्टाइल आंदोलन करणाऱ्या युवासेना पदाधिकारी आणि युवासैनिकांचे कौतुक केल्याचे समजते. त्यानंतर आता आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मोहसीनची युवासेनेच्या सहसचिवपदी नेमणूक करण्यात आली. वाचा: मोहसीन शिवसेनेत येण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होता. काही कारणास्तव त्याने २०१९च्या विधानसभा निवडणुकांच्या दोन वर्षे आधी अर्थात २०१७ला राष्ट्रवादीला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला. सेनेत आल्यापासून त्याने चांगले काम करीत पक्षनेतृत्वाचे लक्ष वेधून घेतले. युवासेनेच्या जनसंवाद यात्रेतही तो सहभागी होता. विशेष म्हणजे मोहसीनची पत्नी अद्यापही राष्ट्रवादीतच आहे. वाचा: