महाराष्ट्राला हादरवणारी घटना! भानामतीच्या संशयातून कुटुंबाला भरचौकात मारहाण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, August 23, 2021

महाराष्ट्राला हादरवणारी घटना! भानामतीच्या संशयातून कुटुंबाला भरचौकात मारहाण

https://ift.tt/3B5ehkQ
चंद्रपूरः महाराष्ट्राला हादरवणारी एक घटना चंद्रपुर तालुक्यात घडली आहे. अंधश्रद्धेला बळी पडत एका कुटुंबाला गावकऱ्यांनी अमानुष मारहाण केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती या तालुक्यातील तेलंगणा- महाराष्ट्र सीमेवरील वणी खुर्द गावात ही संतापजनक घटना घडली आहे. गावात भानामती करण असल्याचा आरोप करत गावातील चार महिला व तीन वृद्धांना खांबांना बांधून मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत सात जण गंभीर जखमी झाले आहेत. तर, पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. वाचाः गावातील दोन- तीन महिलांच्या अंगात देवी आली होती. त्यावेळी या महिलांनी या कुटुंबातील पुरुष व महिलांनी गावावर भानामती केल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर महिलांनी नावं घेतलेल्या सर्वांना गावकऱ्यांनी एका चौकात आणलं व खांबाना सर्वांचे हातपाय बांधत बेदम मारहाण केली. चार महिला आणि तीन वृद्धांना खांबांना बांधून मारहाण करण्यात आली आहे. वाचाः पोलीसांना या घटनेबाबत माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पिडीतांना गावकऱ्यांच्या तावडीतून सोडवले आहे. या पिडीत सात व्यक्तींपैकी पाच व्यक्तींना जिल्हा सामान्या रुग्णलयात दाखल करण्यात आलं आहे. या सर्व प्रकारांनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वाचाः