
मुंबई : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सोमवारी मोठी पडझड झाली, मात्र भारतीयांना इंधन खरेदीसाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत. पेट्रोलियम कंपन्यांनी आज सलग २४ व्या दिवशी पेट्रोल आणि स्थिर ठेवले आहेत. आज मंगळवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.८३ रुपये आहे. आज दिल्लीत पेट्रोल १०१.८४ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०२.४९ रुपये इतका आहे. तर कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०२.०८ रुपये झाले आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव ११०.२० रुपयांवर कायम आहे. बंगळुरात पेट्रोल १०५.२५ रुपये झाले आहे. आज मंगळवारी मुंबईत डिझेलचा भाव ९७.४५ रुपयांवर कायम आहे. दिल्लीत डिझेल ८९.८७ रुपये आहे. चेन्नईत ९३.६३ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९३.०२ रुपये प्रती लीटर झाला आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९८.६७ रुपये झाला आहे. बंगळुरात डिझेल ९५.२६ रुपये आहे. जागतिक कमॉडिटी बाजारात सोमवारी कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ४.१३ टक्क्यांनी घसरला आणि ६५.५२ डॉलर प्रती बॅरल झाला. त्याचबरोबर ब्रेंट क्रूडचा भाव ३.८८ टक्क्यांनी कमी झाला आणि ६८ डॉलर प्रती बॅरल इतका खाली आला आहे. गेल्या आठवड्यात ब्रेंट क्रूडचा भाव ७०.७० डॉलरवर बंद झाला होता.