राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षाच्या वाहनावर दगडफेक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, August 19, 2021

राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षाच्या वाहनावर दगडफेक

https://ift.tt/3k8Nihk
: उस्मानाबाद युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदित्य जीवनराव गोरे यांच्या वाहनावर करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी पारडी फाटा (ता. वाशी, जि. उस्मानाबाद) परिसरात घडली. याविषयी अधिक माहिती अशी, की राष्ट्रवादी वेलफेअरच्या वतीने आई-वडील गमावलेल्या मुलांच्या अडचणी समजून घेण्याबाबत अभियान उस्मानाबाद जिल्ह्यात सुरू आहे. त्या निमित्त जातेगाव, कुक्कडगाव (ता. भूम) येथील निराधार मुलांना भेटण्यासाठी आदित्य गोरे हे उस्मानाबादहून निघाले होते. त्यांची कार (क्रमांक एमएच २५ एएल ००२०) ही राष्ट्रीय महामार्ग सोलापूर- धुळेवर असलेल्या पारडी फाटा येथून भूमच्या दिशेने निघाली होती. सायंकाळची वेळ असल्याने अंधारात मागील बाजूने गाडीवर दगडफेक करण्यात आली. गाडीचा वेग व नियोजित कार्यक्रम यामुळे गोरे यांनी गाडी न थांबवता प्रवास चालू ठेवला. दगडफेकीत गाडीच्या मागच्या बाजूची काच फुटली. आदित्य गोरे आणि कळंबचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी समाधान बाराते हे दोघेही सुखरूप आहेत. घटनेबाबत वाशी पोलिसांना माहिती दिली असून कार्यक्रम संपताच ठाण्यात येऊन तक्रार देणार असल्याचे गोरे यांनी सांगितले. दरम्यान, एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याने उस्मानाबाद जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही दगडफेक कोणी आणि कोणत्या कारणातून केली, याबाबतची नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नाही. याप्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.