मुंबईः केंद्रीय मंत्री () यांनी जनआशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्ध ठाकरेंवर (Cm Uddhav Thackeray) केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळं राज्यातील वातावरण तापले आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी नारायण राणेंना प्रत्युत्तर दिल्यानंतर शिवसैनिकांनीही (Shivsena) राणेंवर हल्ला चढवला आहे. मुंबईतील दादर टीटी भागात राणेंचे पोस्टर लावण्यात आले असून त्यावर कोंबडी चोर असं लिहण्यात आलं आहे. नारायण राणेंच्या वक्तव्याविरोधात मध्यरात्री दादरमध्ये पोस्टरबाजी करण्यात आली. शिवसेनेचे नगरसेवक अमेट घोले यांनी दादर टीटी परिसरात एक पोस्टर लावलं आहे. या पोस्टरवर कोंबडी चोर असं लिहिलेलं आहे. पोलिसांनी अवघ्या एका तासात हे पोस्टर हटवले आहे. मात्र, हे पोस्टर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे. नितेश राणेंचा इशारा नारायण राणे यांच्या वक्तव्यानंतर शिवसैनिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. युवासेनेच्या कार्यकर्त्यांना राणेंच्या जुहूतील घराबाहेर जमण्यास सांगण्यात आल्याचं नितेश राणेंनी काल रात्री ट्वीट करत म्हटलं होतं. यावरुन नितेश राणेंनी सिंहाच्या गुहेमध्ये प्रवेश करण्याची हिंमत करु नका, असा इशारा दिला आहे. नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल मुख्यमंत्र्यावर केलेल्या वक्तव्याप्रकरणी नारायण राणेंना अटक करण्याचे आदेश नाशिक पोलिसांकडून देण्यात आले आहेत. आजच नारायण राणे यांना अटक करुन कोर्टासमोर हजर केलं जाऊ शकतं, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसंच, महाड आणि पुण्यातही नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.