रजनीकांत आणि नीरज चोप्रा यांच्यात आहे खास कनेक्शन? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, August 10, 2021

रजनीकांत आणि नीरज चोप्रा यांच्यात आहे खास कनेक्शन?

https://ift.tt/3AxZMG9
मुंबई: टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरी करणाऱ्या नीरज चोप्राचीच सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. नीरजनं भालाफेकमध्ये सुवर्ण पदक जिंकल्यानंतर सोशल मीडियावरून त्याच्यावर सातत्यानं कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. अगदी सामान्य लोकांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत सर्वांनीच नीरजचं कौतुक केलं आहे. पण अशातच आता अभिनेता रणदीप हुड्डाचं एक ट्वीट सोशल मीडियावर चर्चेत आहे. या ट्वीटमध्ये रणदीप हुड्डानं आणि अभिनेता यांच्यात एक खास कनेक्शन असल्याचं म्हटलं आहे. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारा नेहमीच काही ना काही हटके पोस्ट करताना दिसतो. टोकियो ऑलिम्पिकमधील नीरज चोप्राच्या सुवर्ण कामगिरीनंतर इतर सेलिब्रेटींप्रमाणेच रणदीप हुड्डानं देखील ट्वीट केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये त्यानं सुपरस्टार रजनीकांत आणि नीरज यांच्यात एक खास कनेक्शन असल्याचं म्हटलं आहे. रणदीप हुड्डानं त्याच्या ट्वीटमध्ये एक फोटो शेअर केला आहे. ज्यात अभिनेता रजनीकांत यांच्या फोटो आहे. या फोटोवर लिहिलं आहे, 'तुम्ही नीरज, नीरज, नीरज... असं ओरडलात तर तुम्हाला त्यातून रजनी, रजनी, रजनी... असं ऐकू येईल. आता समजलं का सीक्रेट रजनीकांत सगळीकडे आहेत.' एकीकडे रणदीप हुड्डाचं हे ट्वीट सगळीकडे व्हायरल होताना दिसतंय तर दुसरीकडे चाहते मात्र गोंधळले आहेत. त्यांना रणदीप हुड्डानं या ट्वीटमध्ये नक्की कौतुक कोणाचं केलं आहे हेच समजलेलं नाही. रणदीप हुड्डाच्या कामाबद्दल बोलायचं तर तो अलिकडच्या काळात सलमान खान आणि दिशा पाटनी यांची मुख्य भूमिका असलेल्या 'राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई' या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्यानं खलनायकाची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेचं कौतुकही केलं गेलं होतं. याशिवाय आगामी काळात तो इलियाना डिक्रूझसोबत 'अनफेअर अँड लव्हली' या चित्रपटात दिसणार आहे.