गॅस सिलिंडरची दरवाढ ; पेट्रोलियम कंपन्यांचा व्यावसायिकांना दणका तर सामान्यांना दिलासा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, August 1, 2021

गॅस सिलिंडरची दरवाढ ; पेट्रोलियम कंपन्यांचा व्यावसायिकांना दणका तर सामान्यांना दिलासा

https://ift.tt/3ieHlQk
मुंबई : मागील १५ दिवस पेट्रोल आणि डिझेल दर स्थिर ठेवणाऱ्या पेट्रोलियम कंपन्यांनी आज रविवारी वाणिज्य वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल ७३.५० रुपयांची वाढ केली आहे.तर घरगुती वापरातील गॅस सिलिंडरचा दर जुलै प्रमाणे कायम ठेवला आहे. त्यामुळे आजच्या दरवाढीने छोट्या व्यावसायिकांना कंपन्यांनी दणका दिला असून सामन्य ग्राहकांना किंचित दिलासा मिळाला आहे. इंडियन ऑइलनुसार आज १ ऑगस्टपासून देशभरात वाणिज्य वापराचा १९ किलोचा गॅस सिलिंडर ७३.५० रुपयांनी महागला आहे. या दरवाढीनंतर मुंबईत १९ किलोचा गॅस सिलिंडर १५७९.५० रुपये झाला आहे. दिल्लीत तो १६२३.५० रुपये झाला आहे. चेन्नईत त्याची किंमत १७६१ रुपये आहे. तर कोलकात्यात १९ किलोचा गॅस सिलिंडर १६२३ रुपये आहे. दरम्यान, कंपन्यांनी घरगुती वापराच्या सिलिंडर दरात कोणताही बदल केलेला नाही. मुंबईत आणि दिल्लीत घरगुती वापराच्या सिलिंडरचा दर ८३४.५० रुपये आहे. याआधी पेट्रोलियम कंपन्यानी १ जुलै रोजी घरगुती वापराच्या १४.२ किलो ग्रॅमच्या गॅस सिलींडरच्या किमतीत २५.५० रुपयांची वाढ केली होती. त्याशिवाय व्यावसायिक वापराच्या १९ किलोच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत देखील कंपन्यांनी मोठी वाढ केली होती. १९ किलोचा गॅस सिलिंडर ८४ रुपयांनी महागला होता. वाचा : गेल्या महिन्यात सीएनजीसुद्धा महागला होता महानगर गॅस लिमिटेड या इंधन पुरवठादार कंपनीने १५ जुलैपासून मुंबईत सीएनजीच्या किमतीत प्रती किलो २.५८ रुपये आणि पाईप गॅसच्या दरात प्रती युनिट ५५ पैसे वाढ केली होती. या दरवाढीनंतर मुंबईत सीएनजीचा भाव एक किलोसाठी ५१.९८ रुपये इतका झाला. पाईप गॅससाठी ग्राहकांसाठी प्रती युनिट ५५ पैसे वाढ करण्यात आली. त्यानुसार स्लॅब-१ साठी ३०.४० रुपये प्रती युनिट आणि स्लॅब-२ साठी ३६ रुपये प्रती युनिट दर झाला होता.