
मुंबई : जागतिक बाजारात पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. तेलाचा भाव प्रती बॅरल ७३ डॉलरवर गेला आहे, मात्र पेट्रोलियम कंपन्यांनी तूर्त इंधन दर जैसे थे ठेवले आहेत. आज रविवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल झाला नाही पेट्रोलियम कंपन्यांनी सलग पाचव्या दिवशी इंधन दरात कोणताही बदल केला नाही. आज रविवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेल दर स्थिर ठेवले आहेत. मुंबईत आज एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.५२ रुपये आहे. आज दिल्लीत पेट्रोल १०१.४९ रुपये झाला आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव ९९.२० रुपये इतका आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०१.८२ रुपये झाला आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १०९.९१ रुपयांपर्यंत खाली आला आहे. बंगळुरात पेट्रोल १०४.९८ रुपये झाले आहे. आज देशभरात डिझेल दर सुद्धा स्थिर आहे. मुंबईत ९६.४८ रुपये आहे. दिल्लीत डिझेल ८८.९२ रुपये आहे. चेन्नईत ९३.५२ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९१.९८ रुपये प्रती लीटर इतका आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९७.७२ रुपये असून बंगळुरात डिझेल ९४.३४ रुपये आहे. करोना डेल्टा व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर कमॉडिटी बाजारात कच्या तेलाच्या भावात तेजी दिसून आली होती. सोमवार ते बुधवार असे सलग तीन दिवस तेलाचा भाव ७ डॉलरने वधारला होता. मात्र गुरुवारी या तेजीला ब्रेक लागला. पुन्हा शेवटच्या सत्रात तेलाचा भाव वाढला. मेक्सिकोत तेलाच्या उत्पादनाला फटका बसला आहे. वादळामुळे मेक्सिकोत खनिज तेल उत्पादन बंद ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी दररोज ४००००० बॅरल तेल उत्पादन होत होते. परिणामी तेलाच्या पुरवठ्याला फटका बसला आहे. अमेरिकन कमॉडिटी बाजारात आठवडाभरात ब्रेंट क्रूडचा भाव १.६३ डॉलरने वधारला आणि तो ७२.७० डॉलर प्रती बॅरल झाला. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव १.३२ डॉलरने वधारून ६८.७४ डॉलर झाला. अमेरिकेत कच्च्या तेलाचा साठा कमी झाल्याने तेलाचे भाव तेजीत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.