अजिंक्य रहाणेला चौथ्या कसोटी सामन्यासाठी विश्रांती दिली जाऊ शकते, जाणून घ्या महत्वाचं कारण... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, August 29, 2021

अजिंक्य रहाणेला चौथ्या कसोटी सामन्यासाठी विश्रांती दिली जाऊ शकते, जाणून घ्या महत्वाचं कारण...

https://ift.tt/3ymYnR7
हेडिंग्ले : तिसऱ्या कसोटीत भारतावर पराभवाची नामुष्की ओढवली आहे. पण त्यानंतर चौथ्या कसोटी सामन्यासाठी अजिंक्य रहाणेला वगळण्यात येऊ शकतं, अशी चर्चा सुरु झाली आहे. पण अजिंक्यला चौथ्या सामन्यासाठी का वगळण्यात येऊ शकतं, याचं कारणही आता समोर येत आहे. अजिंक्य हा भारतीय संघाचा उपकर्णधार आहे, पण अजिंक्य हा सातत्याने धावा करण्यात अपयशी ठरत आहे. लॉर्ड्स कसोटीत रहाणेने अर्धशतकी खेळी साकारली होती. पण तिन्ही सामन्यांमध्ये मिळून अजिंक्यला ९५ धावा करता आल्या आहेत. त्यामुळे अजिंक्यला चौथ्या सामन्यासाठी विश्रांती दिली जाऊ शकते. त्यामुळे अजिंक्यच्या जागी सूर्यकुमार यादवला संघात स्थान देण्यात येऊ शकते. त्यामुळे या पराभवानंतर संघात मोठे बदल करण्यात येणार असतील तर अजिंक्यला एका सामन्यासाठी विश्रांती देण्यात येऊ शकते, असे दिसत आहे. पण फॉर्मात नसलेला विराट कोहली हा मोठा निर्णय घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. जर एखादा खेळाडू फॉर्मात नसेल तर त्याला बदलाची गरज असेल, असे म्हटले जाते. त्यामुळे एका सामन्यात अजिंक्यला विश्रांती देऊन पुढच्या सामन्यात त्याला पुन्हा संघात स्थान देण्यात येऊ शकते. त्यामुळे भारतीय संघात पराभवानंतर हे मोठे बदल होणार की, अजिंक्यवर भारतीय संघ विश्वास कायम ठेवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. सध्याच्या घडीला पराभवानंतर काही दिवसांतच चौथा कसोटी सामनाही खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यासाठी काही खेळाडूंनी विश्रांती दिली जाऊ शकते, अशी दाट शक्यता आहे. त्यामध्ये अजिंक्यबरोबरच इशांत शर्मा, रिषभ पंत, रवींद्र जडेजा या खेळाडूंचाही समावेश करण्यात येऊ शकतो. कारण या खेळाडूंना आतापर्यंत कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. त्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघात मोठे बदल पाहायला मिळतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे हे चार बदल करताना भारतीय संघात कोणत्या खेळाडूंना स्थान मिळते, याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले असेल. त्यामुळे आता सर्वांनाच चौथ्या सामन्याच्या नाणेफेकीची उत्सुकता असेल.