मुंबई: संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असताना विरोधी पक्ष भाजप कडून निर्बंधांवर अनेक आक्षेप घेतले जात आहेत. मंदिरे उघडण्याबाबत सातत्याने मागणी करण्यात येत आहे. सभा-समारंभांवरही सवाल केले जात आहेत. या अनुषंगाने मुख्यमंत्री यांनी कठोर भूमिका घेतली असून निर्बंधांना आव्हान देणाऱ्या सर्वांनाच थेट शब्दांत इशारा दिला आहे. त्याचवेळी नागरिकांना अत्यंत महत्त्वाचे आवाहनही केले आहे. ( ) वाचा: राज्यातून संसर्गाची लाट संपलेली नाही. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करून संसर्ग एका मर्यादेच्या पलीकडे वाढू दिला नाही. यामध्ये ज्याप्रमाणे आपले डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी व फ्रंटलाइन वर्कर्स यांचे यश आहे, तसेच आपण नागरिक म्हणून घेतलेली काळजी देखील महत्त्वाची आहे. यापुढे प्रत्येक पाऊल सावधपणे टाकणे गरजेचे असून, आपले सगळ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे. केवळ अर्थचक्र सुरळीतपणे सुरू राहावे म्हणून आपण काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले आहेत, हे विसरता कामा नये. पण नियमांचा भंग करून राजकीय, सामाजिक, धार्मिक व इतर कार्यक्रम आयोजित करून सर्वसामान्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल, अशी काही जणांची वर्तणूक पाहता चिंता वाटते, अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी खंत व्यक्त केली. वाचा: आगामी सण आणि उत्सव पाहता आरोग्याच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही आणि होता आले नाही तरी निदान बनून तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले. कोविड विषयक नियमांचे पालन न केल्याने, तसेच गर्दी जमा करणे, मास्क न लावणे यामुळे स्वत:च्याच नव्हे तर इतरांच्या आरोग्यालाही आपण धोका पोहचवत आहोत. माझे आपणास आवाहन आहे की, कुणाच्याही आमिषाला किंवा चिथावणीला बळी न पडता स्वतःच्या व इतरांच्या आरोग्याचा विचार करा, असे आवाहन करत एकप्रकारे मुख्यमंत्र्यांनी चिथावणी देणाऱ्यांना खडेबोल सुनावले. राज्यामध्ये ऑक्सिजनचे मर्यादित उत्पादन आहे. त्यामुळेच आपण निर्बंधाच्या बाबतीत ऑक्सिजनची उपलब्धता हाच निकष लावला आहे. हे लक्षात घेऊन एक जबाबदार नागरिक म्हणून आमच्या प्रयत्नांना आपल्या सहकार्याची खूप आवश्यकता आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. दरम्यान, केंद्रातील नवे भाजप मंत्री जन आशीर्वाद यात्रा काढत आहेत. ही यात्रा म्हणजे करोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण असल्याची टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी अत्यंत सूचक शब्दांत आवाहन करत सर्व संबंधितांना एकप्रकारे इशाराच दिला आहे. वाचा: