'SBI' चा मॉन्सून धमाका ; कर्जदारांसाठी घेतला हा मोठा निर्णय, होणार असा फायदा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, August 1, 2021

'SBI' चा मॉन्सून धमाका ; कर्जदारांसाठी घेतला हा मोठा निर्णय, होणार असा फायदा

https://ift.tt/3zRR5py
मुंबई : नवीन कर्ज घेण्याचा विचार असल्यास ही बातमी तुमच्या फायद्याची ठरू शकते. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) मॉन्सून धमाका ऑफर जाहीर केली आहे. ज्यात गृह कर्जावरील प्रक्रिया शुल्क १०० टक्के माफ करण्याची घोषणा केली आहे. ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत ही सवलत योजना सुरु राहील, असे बँकेने म्हटलं आहे. एसबीआयने गृह कर्जदारांना आकर्षित करण्यासाठी प्रोसेसिंग फी १०० टक्के माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या एसबीआयकडून गृह कर्जावर ०.४० टक्के प्रोसेसिंग फी आकारली. जाते. मॉन्सून धमाका योजनेत १०० टक्के प्रक्रिया शुल्क माफ केल्याने कर्जदारांची मोठी बचत होणार आहे. स्टेट बँकेचा गृह कर्जदर हा ६.७० टक्के इतका कमी आहे. बाजारात गृह कर्ज बाजारात सर्वात स्पर्धात्मक दर असल्याचा एसबीआयचा दावा आहे. करोना संकटातून अर्थव्यवस्था सावरत असून स्थावर मालमत्ता क्षेत्रात सकारात्मक वातावरण आहे. प्रमुख शहरांमध्ये घर खरेदीचे आकडे वाढत असल्याने बँकेने ग्राहकांना कर्जासाठी प्रोत्साहित केले आहे. किमान व्याजदर आणि प्रक्रिया शुल्कात १०० टक्के माफी यामुळे ग्राहक गृहकर्ज घेण्यासाठी पुढाकार घेईल, असा विश्वास एसबीआयचे व्यवस्थापकीय संचालक (आर अँड डीबी) सी. एस. शेट्टी यांनी व्यक्त केला. योनो ऍपवरून गृह कर्जासाठी अर्ज केल्यास कर्जदाराला आणखी ०.०५ टक्के सवलत दिली जाणार आहे. त्याशिवाय महिला कर्जदाराला अतिरिक्त ०.०५ टक्के व्याजदर सवलत असेल, असे बँकेने म्हटलं आहे.