'तालिबानवर लगेचच संशय घेऊ शकत नाही, पण भारतावर कुरघोडी केली तर प्रत्युत्तरास सज्ज' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, September 9, 2021

'तालिबानवर लगेचच संशय घेऊ शकत नाही, पण भारतावर कुरघोडी केली तर प्रत्युत्तरास सज्ज'

https://ift.tt/3BXn4pF
नवी दिल्लीः अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा ( ) केल्यानंतर तालिबान भारतात कुरघोड्या तर करणार नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे. खासकरून ( ) काश्मीरमध्ये. आता सरकारच्या सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. तालिबानवर आम्हाला सध्यातरी कुठलाही संशय नाही. काश्मीरमध्ये हस्तक्षेप करणार नाही, असं तालिबानने वेगवेगळ्या वक्तव्यांमधून स्पष्ट केलं आहे. तालिबान हे योग्यच करत आहे. तरीही तालिबानने कुरघोडीचा प्रयत्न केल्यास त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही तयार आहोत, असं सूत्रांनी सांगितलं. अफगाणिस्तानमधील परिस्थिती बदलल्यानंतर नियंत्रण रेषेवर (LoC) काही फरक पडेल का? यापूर्वीही तालिबानी आले होते, एवढचं नव्हे तर दुसऱ्या देशातील दहशतवादी आले होते. ते आल्यावर आम्ही बघू. पण सध्यातरी त्यांच्या बोलण्यावर विश्वास करूया आणि हस्तक्षेप करणार नाही, असं सूत्रांनी सांगितलं. अफगाणिस्तानमध्ये सत्तेत आलेला तालिबान हा बदलला आहे की २० वर्षांपूर्वीचा आहे? हे आम्ही बघत आहोत. अफगाणिस्तानची गेल्या २० वर्षांत प्रगती झाली. पण ते तिथे आता अधोगती होणार का? तालिबान आधी सारखाच असेल तर तेथील जनता त्रस्त होईल. खास करून महिलांसाठी आणि आंतरराष्ट्रीय समाज आणि भारतासाठीही हे योग्य ठरणार नाही. भारताने अफगाणिस्तानमध्ये विकासाची अनेक कामं केली आहेत. अफगाणिस्तानमधील विकासाच्या हलचाली सुरूच ठेवल्या पाहिजे, अशी भारताची अपेक्षा असल्याचं सूत्रांनी म्हटलं. तालिबानने १५ ऑगस्टला अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर कब्जा केला. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी त्याच दिवशी देश सोडून पळाले. आता तालिबानने नेता मुल्ला अखुंद याच्या नेतृत्वात अफगाणिस्तानमध्ये अंतरिम सरकार स्थापन केले आहे.