फ्लॅटमध्ये पोलिसांनी अचानक छापा टाकला आणि समोर आली धक्कादायक माहिती - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, September 9, 2021

फ्लॅटमध्ये पोलिसांनी अचानक छापा टाकला आणि समोर आली धक्कादायक माहिती

https://ift.tt/3jUoU4v
यवतमाळ : राजन्ना अपार्टमेंटमध्ये निलेश पिपरानी यांच्या फ्लॅट क्रमांक ४०१ मध्ये जुगार सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांना मिळाली. त्यावरून मंगळवारी रात्री जाजू चौकातील राजन्ना अपार्टमेंटमध्ये पोलिसांनी धाड टाकली. यावेळी जुगार खेळत असलेल्या १३ जणांना अटक करण्यात आली. तसंच त्यांच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. निलेश महेंद्र पिपरानी (४३) रा.राजन्ना अपार्टमेंट, मनिष रामविलास मालानी (४४) रा.बोरी अरब, सौरव शिवम मोर (४१) रा.मेन लाईन, विपुल पद्माकर खोब्रागडे (१९) रा.पाटीपुरा, राहुल सुरेंद्र शुक्ला (४०), नवल नारायण बजाज उर्फ अग्रवाल (५५) रा. चांदोरे नगर, प्रेमरतन ताराचंद राठी (४४) रा.गांधी नगर यवतमाळ, रुपेश आनंदराव कडू (४२) रा.चामनगाव रोड, सुनील हरीरामजी अग्रवाल (५३) रा.गुरूदेव नगर, लक्ष्मिकांत चंपालालजी गांधी (५८) रा.राजन्ना अपार्टमेंट, अनिल भवरीलालजी मानधना (५४) रा.श्रोत्री हॉस्पीटल जवळ, कमलेश अमृतलाल गंधेचा (४८) रा. माईंदे चौक, अशोक ओंकारमल भंडारी (६०) रा. सारस्वत असं जुगार खेळताना अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या धाडीनंतर आरोपींकडून पाच लाख ५७ हजार रुपये रोख, १६ मोबाईल (किंमत एक लाख ९४ हजार रुपये), दुचाकी वाहने (किंमत चार लाख रुपये) असा एकूण ११ लाख ५१ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान, सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.