
रत्नागिरीः मुंबई परळ- दापोली एसटी बसला रविवारी पहाटे ५ वाजता म्हाप्रळ येथे अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात चार प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील म्हाप्रळ येथे शेनाळे घाटात एसटी बसला अपघात झाला आहे. या बसमध्ये एकूण ३० प्रवासी होते. चार प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. तर, एसटी बस ड्रायव्हरच्या हाताला दुखापत झाली आहे. एसटी बस उलटून हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यावेळी एकूण ३० प्रवासी बसमध्ये होते. दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून सर्व चार जखमींना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती मंडणगड एसटी डेपो मॅनेजर फडतरे यांनी दिली आहे. वाचाः दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला याबाबत पंचनामा करण्यात येणार असल्याची माहिती आहे. तसंच, अपघात किरकोळ असून सुदैवानं कोणतीही जिवीतहानी झाली नाही. वाचाः