अनिल देशमुखांनी दडवले १७ कोटी; प्राप्तीकर विभागाच्या तपासात उघड - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, September 21, 2021

अनिल देशमुखांनी दडवले १७ कोटी; प्राप्तीकर विभागाच्या तपासात उघड

https://ift.tt/39mB53E
म. टा. प्रतिनिधी, राज्याचे यांनी १७ कोटी रुपयांची मिळकत दडवली. तसेच त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी अनेक बनावट कंपन्यांकडे पैसा वळवला, असे प्राप्तीकर विभागाने स्पष्ट केले आहे. विभागाने अलिकडेच घातलेले छापे आणि तपासात हे उघड झाले. या धाडींसंदर्भात प्राप्तीकर विभागाने प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. प्राप्तीकर विभागानुसार, नागपुरातील एक प्रमुख सार्वजनिक व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांसंदर्भात अलिकडेच तपास करून जप्तीची कारवाई करण्यात आली. नागपूर व महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये शिक्षण, वेअरहाऊसिंग आणि कृषी-व्यवसाय क्षेत्रामध्ये हे कुटुंब कार्यरत आहे. या छाप्यांमध्ये नागपूर, मुंबई, नवी दिल्ली आणि कोलकातामध्ये ३०हून अधिक ठिकाणी तपास व सर्वेक्षण करण्यात आले. यांत अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे, पत्रके व अन्य डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले. या कुटुंबीयांनी अनेक बेहिशेबी आर्थिक व्यवहार केले आहेत. यामध्ये मनी लाँड्रिंग, बोगस देणगी पावत्या, बेहिशेबी रोख खर्च इत्यादी ट्रस्टच्या नावे केले गेले आहे. मनी लाँड्रिंगद्वारे दिल्लीतील बनावट कंपन्यांमध्ये ४.४० कोटी रुपये गुंतवले आहेत. ट्रस्टच्या तीन शैक्षणिक संस्थांमार्फत १२ कोटी रुपयांहून अधिक रकमेचा गैरवापर केला आहे. एकंदरच तपासादरम्यान सापडलेल्या पुराव्यानुसार या कुटुंबाने १७ कोटी रुपयांचे उत्पन्न दडवले आहे. तसेच अनेक लॉकर्सदेखील सापडले. तपासादरम्यान सापडलेल्या अनेक बँक लॉकर्ससंदर्भात बँकांना प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आले आहेत. याबाबत पुढील तपास सुरू आहे, असे प्राप्तीकर विभागाने स्पष्ट केले आहे.