मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सध्या युएईमध्ये आयपीएल २०२१च्या दुसऱ्या हंगामाची तयारी करत आहे. विराट कोहील नेहमीच सामजिक कार्यात पुढाकार घेतो. करोना व्हायरसच्या काळात विराटने पत्नी अनुष्कासोबत मोठे मदत कार्य केले होते. आता देखील विराटने असेच एक कौतुकास्पदक काम केले आहे. ज्याचा फायदा मुंबईतील भटक्या पशूंना होणार आहे. वाचा- विराट कोहली फाउंडेशनने मड आणि मलाड येथील भटक्या पशूसाठी एक ट्रॉमा आणि रिहॅब सेंटरचे उद्घाटन केले. या वर्षाच्या सुरुवातीला विराटने म्हटले होते की, तो मुंबईत जनावरांच्या देखभालीसाठी दोन सेंटर उभे करणार आहे. विराटने पत्नी अनुष्कार शर्माला याचे श्रेय दिले. शहरातील भटक्या जनावरांना येणाऱ्या त्रासाबद्दल तिने सांगितले होते. अनुष्काने अनेक वेळा जनावरांची काळजी आणि त्यांचे हितासाठी पाठिंबा दिला आहे. वाचा- अनुष्कापासून प्रेरणा घेत कोहली फाउंडेशनच्या माध्यमातून जनावरांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. मी जनावरांच्या कल्याणासाठी अनुष्काच्या प्रयत्नांचे कौतुक करतो. तिच्यापासून प्रेरणा घेत आम्ही शहरातील जनावरांच्या सुरक्षेसाठी एक जागा तयार करत आहोत. आम्हाला ही घोषणा करताना आनंद होतेय की हे सेंटर तयार झाले आहे आणि चांगल्या बदलासाठीचे हे पहिले पाऊल ठरेल. वाचा- या सेंटरमध्ये जखमी जनावरांचे उपचार होतील. दहा तज्ञ लोकांची एक टीम विवाल्डिस अॅनिमल हेल्थ आणि वॉयस ऑफ स्ट्रे अॅनिमलच्या मदतीने ऑपरेशन करतील. वाचा- विवाल्डिस अॅनिमल हेल्थचे संस्थापक आणि सीईओ कुणाल खन्ना म्हणाले की, आम्ही २१ एप्रिलला विराट कोहली फाउंडेशन आणि आवाज सोबत याची घोषणा केली होती. पाच महिन्यानंतर ट्रॉमा सेंटर आणि रिहॅब सेंटर तयार झाले आहे. मी अनुष्का आणि विराट यांचे आभार मानतो की त्यांनी जनावरांच्या कल्याणासाठी पाठिंबा दिला.