प्रयागराज : महंत यांच्या मृतदेहाचं आज पार पडणार आहे. त्यानंतर त्यांचा मृतदेह आप्तेष्टांकडे सोपवण्यात येईल. आज दुपारी पोस्टमॉर्टेमनंतर गिरी यांच्या मृतदेहाला दिली जाणार आहे. पाच डॉक्टरांची एक टीम महंत नरेंद्र गिरी यांच्या मृतदेहाचं करत आहे. एमएलएन मेडिकल महाविद्यालयाच्या दोन, जिल्हा रुग्णालयाच्या दोन आणि मुख्यमंत्री कार्यालयायाशी संबंधीत एका डॉक्टरचा या टीममध्ये समावेश आहे. पोस्टमॉर्टेमच्या संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओग्राफीदेखील करण्यात येणार आहे. प्रयागराजमध्ये आज शाळा बंद नरेंद्र गिरी यांच्या अंत्यविधीसाठी प्रयागराजमध्ये मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रयागराजमध्ये आज इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतचे सर्व वर्ग ठेवण्याचे आदेश शाळा आणि कोचिंग क्लासेसला देण्यात आले आहेत. पोस्टमॉर्टेमनंतर वाघंबरी मठात मृतदेह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर अंतिम यात्राही काढण्यात येणार आहे. सोमवारी आढळला मृतदेह सोमवारी, देशभरातील साधूंची सर्वात मोठी संघटना असणाऱ्या अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह सापडल्यानंतर मोठी खळबळ उडाली. बाघंबरी मठातील आपल्या खोलीत पंख्याला गळफास घेऊन केल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलं. गिरी यांच्या मृतदेहाजवळ पोलिसांना सात-आठ पानी मजकूरही आढळला. मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्यानं आपण जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याचं या सुसाईड नोटमध्ये उल्लेख होता. तसंच, या मठाच्या भावी वाटचालीबाबतही गिरी यांनी मार्गदर्शन केल्याचं दिसून आलं. या पत्रावरचं हस्ताक्षर नरेंद्र गिरी यांचंच असल्याचा दावा महंत बलवीर गिरी यांनी केला आहे. बलवीर गिरी हे नरेंद्र गिरी यांचे संभाव्य उत्तराधिकारी आहेत. ही कागदपत्रं न्यायवैद्यक चाचणीसाठी पाठविण्यात आली आहेत, अशी माहिती पोलिस महानिरीक्षक के. पी. सिंह यांनी दिली. पोलिसांची चौकशी सुरू दरम्यान, नरेंद्र गिरी यांच्या सुरक्षेत तैनात करण्यात आलेल्या चार जणांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. बेजबाबदारपणासाठी या चारही जणांना निलंबित करण्याची मागणी करण्यात येतेय. नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी मंगळवारी १८ सदस्यीय विशेष चौकशी दलाचं (SIT) गठन करण्यात आलंय.