'मोदींवर तर देश विकल्याचा आरोप होतोय, त्यांचं सरकार पडलं का?' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, September 20, 2021

'मोदींवर तर देश विकल्याचा आरोप होतोय, त्यांचं सरकार पडलं का?'

https://ift.tt/3nQi4iG
मुंबई: 'आरोप करणं ही हल्ली फॅशन झालीय. एखाद्या सरकारवर आरोप झाले म्हणून ते सरकार पडत नाही. मोदी-शहांवरही अनेक आरोप होताहेत. मोदी सरकारनं तर देश विकल्याचाही आरोप होतोय, पण म्हणून त्यांचं सरकार पडलं का?,' असा रोकडा सवाल शिवसेनेचे खासदार यांनी किरीट सोमय्यांच्या आरोपांवर बोलताना केला आहे. भाजपचे माजी खासदार यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आरोपांची राळ उडवून दिली आहे. त्यामुळं सध्या पश्चिम महाराष्ट्रातील वातावरण तापलं आहे. कोल्हापूर दौऱ्यावर निघालेल्या सोमय्या यांना पोलिसांनी कराडमध्ये अडवलं आहे. तिथं पत्रकार परिषद घेऊन सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकार व शिवसेनेवर आरोप केले आहेत. सोमय्यांच्या या आरोपांना संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'किरीट सोमय्यांचं जे काही सुरू आहे. ते केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर सुरू आहे. खरंतर राज्यातील नेत्यांवर काही आक्षेप असतील तर त्याचा तपास करण्यासाठी स्थानिक यंत्रणा आहेत. मात्र, केंद्र सरकार त्या सर्वांना डावलून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत आहे. महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जातोय,' असा आरोप राऊत यांनी केला. वाचा: 'आपल्या राज्यात आणि देशात लोकशाही आहे. कोणालाही काहीही आरोप करण्याचा अधिकार आहे. आरोप करणाऱ्याच्या तोंडाला कोणी टाळं लावू शकत नाही. त्यांनी चंद्रावर, मंगळावर जाऊन आमच्या जमिनी शोधाव्यात. केंद्राच्या इशाऱ्यावर कुणी आरोप करायचं ठरवलं भाजपशासित राज्यांतील मंत्र्यांवर आणि नेत्यांवरही आरोप होतात. खुद्द मोदी-शहांवरही आरोप होतात. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या विकल्याचा आरोप मोदींवर होतोय. पण खोट्या आरोपांनी सरकारला भोकं पडत नाहीत. आरोपांमुळं सरकार पडत नाही. महाविकास आघाडी सरकार डरपोक नाही. आम्ही झुकणार नाही,' असं राऊत यांनी ठणकावलं. त्याला नाटक म्हणू नका! 'किरीट सोमय्या जे करताहेत त्याला नाटक म्हणू नका. 'नाटक' शब्दाचा अपमान करू नका. महाराष्ट्रात या शब्दाला प्रतिष्ठा आहे,' असा टोलाही राऊत यांनी हाणला. 'सोमय्यांवरील जिल्हाबंदीशी मुख्यमंत्री कार्यालयाचा अजिबात संबंध नाही. एखाद्या जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर गृहखात्याला प्रतिबंधात्मक आदेश देण्याचा अधिकार आहे. त्यानुसार गृहखातं ही कारवाई करत आहे,' असंही त्यांनी स्पष्ट केलं. वाचा: