संथ कारभाराचा पुन्हा प्रत्यय; 'एमएमआरडीए'ला बारा तासांनी जाग - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, September 18, 2021

संथ कारभाराचा पुन्हा प्रत्यय; 'एमएमआरडीए'ला बारा तासांनी जाग

https://ift.tt/3nO8bSz
: वांद्रे-कुर्ला संकुलातील एससीएलआर जोडरस्त्यांवरील पुलाचा गर्डर कोसळल्यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या संथ कारभाराचा प्रत्यय येथेही दिसून आला. शुक्रवारी पहाटे चार वाजून ४० मिनिटांच्या सुमारास घडलेल्या पूल दुर्घटनेची अधिकृत माहिती 'एमएमआरडीए'ने जवळपास १२ तासांनंतर म्हणजे, सायंकाळी ५ वाजून ५५ मिनिटांनी दिली. पूल दुर्घटनेची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी मेट्रोचा खांब कोसळणे, मोनोरेलच्या पुलाचा भाग कोसळणे, फ्रीवेच्या पुलाचा भाग कोसळणे या घटना घडल्या आहेत. यामुळे मुंबईत काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेची कंत्राटदारांकडून पुरेपूर काळजी घेण्यात येते का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. ‘’ हे नगरविकास विभागाच्या अधिकारांतर्गत येते. या खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे आहेत. मात्र पूल दुर्घटनेनंतर दुपारी २ वाजून १० मिनिटांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून एमएमआरडीएने चौकशी सुरू केल्याची माहिती दिली. शिंदे यांनी मात्र ३.५१ मिनिटांनी या घटनेबाबत माहिती दिली. गेल्या काही दुर्घटनांसंबंधात एमएमआरडीएला विचारले असता, कामगार सुरक्षा आणि सुरक्षा मानकांचे अचूक पालन करण्याबाबत कंत्राटातच स्पष्ट तरतूद असते असे सांगण्यात आले. काम करताना एखादा अपघातात कामगार जखमी झाला अथवा दगावल्यास कामगारांच्या नातेवाईकांना कामगार कायद्याप्रमाणे भरपाई देण्यात येते. दुर्घटना घडल्यास किमान ३ ते कमाल ५ अधिकाऱ्यांची चौकशी समिती स्थापन केली जाते. त्या चौकशी अहवालातील दोषींची जबाबदारी निश्चित करून त्याला दंड ठोठावण्यात येतो, असे एमएमआरडीए प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले. कामगाराना मिळणारी भरपाई आणि कंत्राटदारांना ठोठावणारा दंड यांबाबत नेमकी माहिती देणे मात्र त्यांनी टाळले.