पोस्टरवॉर : मुख्यमंत्री 'कंस' तर विरोधी पक्षनेता 'कृष्णा'च्या रुपात! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, September 1, 2021

पोस्टरवॉर : मुख्यमंत्री 'कंस' तर विरोधी पक्षनेता 'कृष्णा'च्या रुपात!

https://ift.tt/2WH26ME
: मध्य प्रदेशात कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्तानं जोरदार पोस्टरबाजी करण्यात आलीय. काँग्रेसकडून मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांच्या फोटोसहीत झळकावण्यात आलेले काही पोस्टर चर्चेचा विषय ठरलेत. भोपाळमध्ये ठिकठिकाणी दिसून येत असलेल्या या पोस्टरवर विरोधी पक्षनेते कमलनाथ चक्क कृष्णाच्या रुपात दिसत आहेत. तर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा उल्लेख '' असा करण्यात आलाय. यामुळे, एक नवा वाद निर्माण झालाय. (CM Vs ) भोपाळ स्थित काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर असाच एक पोस्टर दिसत आहे. या पोस्टरवर मुख्यमंत्री शिवराज यांच्यासाठी मामा 'कं...' असा शब्द वापरण्यात आला आहे. तसंच तत्कालीन काँग्रेस सरकारमध्ये घेण्यात आलेल्या निर्णय मुद्देसूदपणे या पोस्टरवर दिसून येत आहेत. पोस्टरवर कमलनाथ सरकारनं ओबीसी २७ टक्के आणि सामान्यांना १० टक्के आरक्षण देण्याशिवाय २७ लाखहून अधिक शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आलाय. पोस्टरवर भाजप सरकारमध्ये वाढलेली महागाई, बेरोजगारी आणि महिलांवरील अत्याचार याचाही उल्लेख करण्यात आला आहे. कमलनाथ यांनी २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत शिवराज सिंह चौहान यांना धडा शिकवायला हवा. जेव्हा जेव्हा धरतीवर पापाची संख्या वाढते तेव्हा परमात्म्याकडून कुणाला तरी पाठवलं जातं. कमलनाथ हे तेच विकास पुरुष आहेत, असं सांगतानाच भाजपचं पाप धुवून काढण्यासाठी कमलनाथ सक्षम असल्याचं काँग्रेस नेते शहयार खान यांनी म्हटलंय. शिवराज सिंह चौहान यांनी राज्याच्या विकासासाठी पुरेसं कामही केलेलं नाही असं सांगतानाच राज्यात विकास करावा हे जाणून घ्यायचं असेल तर हे एक आदर्श मॉडेल आहे, असंही शहयार खान यांनी म्हटलंय. या पोस्टरद्वारे काँग्रेस कार्यकर्त्यांकडून कमलनाथ यांना २०२३ च्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याचं भाष्य करत भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न केला जातोय. मुख्यमंत्र्यांसाठी वापरण्यात आलेल्या 'कं...' या शब्दावर भाजपकडून तीव्र आक्षेप घेण्यात आलाय.