
जळगाव/ : औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्याला अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला. यात तालुक्यातील भिलदरी पाझर तलाव फुटून मोठी हानी झाली. शनिवारी थेट तिथे पोहचत जलसंपदा मंत्री यांनी पाहणी केली. मुख्य म्हणजे या तलावाकडे जाण्यासाठी मोठा रस्ता नव्हता. तरीही कार्यकर्त्याच्या मोटारसायकलवरून तीन किलोमीटरचा खडतर प्रवास करत आणि पुढे चिखल तुडवत पाटील तिथे पोहचले. यावेळी पाझर तलावाच्या दुरुस्तीला आणि शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईला प्रथम प्राधान्य देण्याचे आश्वासन देत त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. ( ) वाचा: जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे , औरंगाबाद इथे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त गावांची पाहणी करत आहेत. शनिवारी सकाळी कन्नड व चाळीसगावच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पूरग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांची विचारपूस केली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तीन दिवसांपूर्वी अचानक झालेल्या अतिवृष्टीने कन्नड तालुक्यातील भिलदरी पाझर तलाव ओव्हर फ्लो होऊन फुटला होता. त्यामुळे जयंत पाटील यांनी या तलावाची पाहणी केली. यावेळी अधिकारी वर्गही उपस्थित होता. पहिल्यांदा या तलावाची दुरुस्ती करू, असं आश्वासन जयंत पाटील यांनी यावेळी जनतेला दिले. वाचा: भिलदरी पाझर तलाव फुटल्याने जमिनीत अतिरिक्त पाणीसाठा झाल्याने ती पाणथळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकार घेईल, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. आजूबाजूचा परिसर या पाझर तलावातील पाण्यावर शेती आणि घरगुती वापराच्या पाण्यासाठी अवलंबून होता. स्थानिकांची पाण्याविना कोणतीही गैरसोय होऊ नये याची दक्षता घेतली जाईल, असे ठाम आश्वासनही जयंत पाटील यांनी इथल्या नागरिकांना दिले. वाचा: