सांगली: येथे दवाखान्याच्या इमारतीचा स्लॅब कोसळून एक रुग्ण महिला ठार झाली, तर तिची सख्खी बहिण गंभीर जखमी झाली आहे. (वय ४५) असे मृत महिलेचे नाव आहे, तर या जखमी आहेत. ही दुर्घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत विटा पोलिसात नोंद झाली आहे. ( ) वाचा: याबाबत अधिक माहिती अशी की, विट्यातील लेंगरे रस्त्यावर यांचा आशीर्वाद क्लिनिक या नावाचा दवाखाना आहे. या दवाखान्यात उपचार घेण्यासाठी रुग्णांची नेहमीच वर्दळ असते. मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आयटीआय कॉलेज समोरील अनिता सुरेश माळी आणि त्यांची बहीण अलका बबन शिंदे या आल्या होत्या. आत दुसरे रुग्ण असल्याने त्या दोघीही बाहेर पायरीवर आपसांत बोलत बसल्या होत्या. त्याचवेळी दवाखान्याच्या इमारतीचा पुढचा स्लॅब कोसळला. स्लॅबचा हा भाग नेमका खाली बसलेल्या महिलांच्या अंगावर कोसळला. यात डोक्याला आणि मेंदूला जबर मार लागल्याने अनिता माळी यांचा जागीच मृत्यू झाला तर अलका शिंदे यांच्या डोक्यास, कंबर आणि पायाला जबर मार लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाचा: