हा तर आंतरराष्ट्रीय कट; क्रिकेट दौरा रद्द झाल्यावर पाकिस्तानचा जावाई शोध - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, September 18, 2021

हा तर आंतरराष्ट्रीय कट; क्रिकेट दौरा रद्द झाल्यावर पाकिस्तानचा जावाई शोध

https://ift.tt/3AlfcxC
नवी दिल्ली: सामना सुरू होण्याच्या काही तास आधी न्यूझीलंड संघाने पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला आणि एकच खळबळ उडाली. न्यूझीलंड संघाने फक्त मैदानात उतरण्यास नाही तर हॉटलमधून बाहेर पडण्यास नकार दिला. आंतरराष्ट्रीय पातळीवर इज्जत वाचवण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी न्यूझीलंडचे पंतप्रधान जॅसिंडा अर्डर्न यांना फोन केला. पण त्यांनी खेळाडूंच्या सुरक्षेचे कारण देऊन संघाचा दौराच रद्द केला. न्यूझीलंडचा संघ १८ वर्षानंतर पाकिस्तान दौऱ्यावर आला होता. दोन्ही संघात ३ वनडे आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका होणार होती. वाचा- न्यूझीलंड संघाने दौराच रद्द केल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची आब्रु केली. पण इस्लामाबादमध्ये गृहमंत्री शेख रशीद अहमद यांनी न्यूझीलंड संघाचा दौरा रद्द करणे हा एक आंतरराष्ट्रीय कट असल्याचे म्हटले. शेख यांनी कोणाचे नाव घेतले नाही. पण अफगाणिस्थानमध्ये जे काही सुरू आहे त्यानंतर काही गट पाकिस्तानला बळीचा बकरा करण्याचा प्रयत्न करत आहेत. न्यूझीलंडने दौरा रद्द केल्यानंतर अहमद यांनी असा ही दावा केला की, किवी संघाच्या अधिकाऱ्यांकडे पाकिस्तानमध्ये धोका असल्याचा कोणताही ठोस पुरावा नव्हता. वाचा- पाकिस्तानमध्ये पाहुण्या संघाच्या सुरक्षेसाठी ठोस सुरक्षाव्यवस्था असताना देखील न्यूझीलंडने दौरा रद्द करण्याचा एकतर्फी निर्णय घेतला. न्यूझीलंड क्रिकेट संघाने २००२ साली कराचीत खेळाडू थांबलेल्या हॉटेल बाहेर झालेल्या बॉम्ब स्फोटानंतर पाकिस्तान दौरा सोडला होता. २००३ साली न्यूझीलंडने पाकिस्तानमध्ये पाच सामन्यांची वनडे मालिका खेळली होती. त्यानंतर ते प्रथमच पाक दौऱ्यावर गेले होते. १५ सप्टेंबरपासून सराव सुरू करण्याआधी न्यूझीलंडचा संघ ३ दिवसांच्या क्वारंटाइनमध्ये होता. दोन्ही संघात १७, १९, २१ सप्टेंबर रोजी लढत होणार होती. वाचा-