नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगच्या परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालाय. या परीक्षेत ७६१ उमेदवारांना उत्तीर्ण होण्यात यश मिळालंय. या परिक्षेत या तरुणानं अव्वल स्थान पटकावलंय. तर दुसऱ्या क्रमांकावर आणि तिसऱ्या क्रमांकावर यांनी यश खेचून आणलंय. यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ७६१ उमेदवारांमध्ये ५४५ पुरुष तर २१६ महिलांचा समावेश आहे. ( Congratulates , ) या यशामुळे शुमला आणखी एक आनंदाचा क्षण अनुभवता आला. सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या यांनी अमेरिकेतील आपल्या भरगच्च कार्यक्रमातही वेळात वेळ काढून शुभमशी फोनवरून थेट संपर्क साधला. यावेळी, पंतप्रधान मोदींनी शुभमशी संवाद साधताना त्याचं कौतुकही केलं आणि भावी वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा दिल्या. सोबतच, पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावरून या परिक्षेत यश मिळवणाऱ्या सर्व उमेदवारांचं अभिनंदन केलंय. 'यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत यश मिळवणाऱ्या उमेदवारांचं अभिनंदन. सार्वजनिक सेवेतील रोमांचक आणि समाधानकारक कारकीर्द तुमची वाट पाहत आहे' असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी उमेदवारांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु, या परिक्षेत उत्तीर्ण होण्यात यश न मिळालेल्या उमेदवारांनीही निराश होण्याची गरज नाही. अशा अनेक संधी तुमची वाट पाहत आहेत, असंही यावेळी पंतप्रधानांनी म्हटलंय. उल्लेखनीय म्हणजे, पंतप्रधान मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. क्वॉड समिटमध्ये सहभागी होतानाच त्यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरीस यांचीही भेट घेतलीय. मूळ बिहारच्या कटिहारचा रहिवासी असलेला शुभम २४ वर्षांचा आहे. त्यानं तिसऱ्या प्रयत्नात हे यश मिळवलंय. आयआयटी मुंबईतून त्यानं सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतलीय. पदवीनंतर त्यानं यूपीएससी परिक्षेच्या तयारीला सुरूवात केली होती. पर्यायी विषय म्हणून त्यानं मानव विज्ञानाची निवड केली होती.