वार्षिक ९.७५ टक्क्यांपर्यंत परतावा; इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्सचा डिबेंचर्स इश्यू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, September 4, 2021

वार्षिक ९.७५ टक्क्यांपर्यंत परतावा; इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्सचा डिबेंचर्स इश्यू

https://ift.tt/3BxN6Q2
मुंबई : हाउसिंग फायनान्स क्षेत्रातील इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडने प्रत्येकी १००० दर्शनी मूल्य असलेल्या सिक्युअर्ड आणि/किंवा अनसिक्युअर्ड, रीडिमेबल, नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्सचा पब्लिक इश्यूची घोषणा केली आहे. ट्रांन्च I इश्यू ६ सप्टेंबर २०२१ रोजी खुला होईल आणि २० जुलै २०२१ रोजी बंद होईल. या योजनेत वार्षिक कूपन दर ८.०५ टक्क्यांपासून ९.७५ टक्क्यांपर्यंत (अटी आणि शर्थी लागू) असेल असे कंपनीने म्हटलं आहे. वाचा : ट्रान्च I इश्यूमध्ये २०० कोटी रकमेसाठीची बेस इश्यू साइझ (बेस इश्यु साइझ) आहे. यात एकूण ८०० कोटींपर्यंतच्या ग्रीन शू (जास्त वाटप) पर्यायाचा समावेश असून तो एकूण १००० कोटींपर्यंत असू शकतो (ट्रान्च I इश्यु), असे कंपनीने म्हटलं आहे. एनसीडी इश्युतर्फे सबस्क्रिप्शनसाठी अनेक पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यांचा कूपन दर वार्षिक ८.०५ टक्क्यांपासून ९.७५ टक्क्यांपर्यंत आहे. फिक्स्ड कूपन धारण केलेल्या एनसीडीच्या एकूण १० सीरिज आहेत आणि त्यांचा मुदत कालावधी २४ महिने, ३६ महिने, ६० महिने, ८७ महिने असा असून त्यात वार्षिक, मासिक आणि संचयी पर्याय उपलब्ध आहे. हे एनसीडी एनसीडी बीएसई आणि एनएसईमध्ये (एकत्रितपणे “स्टॉक एक्सेंजेस”) सूचिबद्ध होण्यासाठी प्रस्तावित आहेत आणि बीएसई हे या इश्युसाठी नियुक्त स्टॉक एक्स्चेंज आहेत. या एनसीडींना क्रिसिल रेटिंग्ज लिमिटेडने क्रिसिल एए/स्टेबल असे मानांकन दिले आहे आणि ब्रिकवर्क रेटिंग्ज इंडिया प्रा. लि.ने बीडब्ल्यूआर एए+/निगेटिव्ह (डबल ए प्लस/निगेटिव्ह) असे मानांकन दिले आहे. जे कंपनीने आणि/किंवा त्यांच्या उपकंपन्यांनी या आधी इश्यु केलेल्या एनसीडी/बाँड(बाँड्स)चे धारक, जसे प्रकरण असेल त्याप्रमाणे, आणि/किंवा इंडिया बुल्स फायनान्स लिमिटेडचे इक्विटी शेअरहोल्डर (शेअरहोल्डर्स) आहेत जसे प्रकरण असेल त्यानुसार, त्यांना वाटपासाठी निश्चित केलेल्या दिवशी कॅटेगरी III (एचएनआय) आणि कॅटेगरी IV (रिटेल) गुंतवणूकदारांसाठी या प्रस्तावित इश्युमध्ये कमाल ०.२५ टक्क्यांपर्यंत अतिरिक्त प्रोत्साहनलाभ ऑफ करण्यात येईल. या इश्यूसाठी लीड मॅनेजर्स म्हणून एडलवाइज फायनान्शिअल सर्व्हिसेस लि., आयआयएफएल सिक्युरिटीज लि. आणि ट्रस्ट इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायजर्स प्रा. लि. हे काम पाहणार आहेत. या ट्रान्च I इश्युच्या माध्यमातून संकलित झालेला किमान ७५ टक्के निधी कर्ज, आर्थिक सहाय्य आणि कंपनीच्या विद्यमान कर्जाच्या व्याजाच्या व मुद्दल रकमेच्या परतफेडीसाठी वापरण्यात येईल आणि शिल्लक निधी सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी वापरण्याचे प्रस्तावित आहे. ट्रान्च I इश्युमध्ये जमा झालेल्या रकमेच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त नसलेल्या वापराच्या अधीन असेल. अनसिक्युअर्ड एनसीडी या सबॉर्डिनेटेड ऋण प्रकारातील असतील आणि श्रेणी II भांडवलासाठी पात्र असतील.