पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी चरणजीत सिंह चन्नी गुरुद्वारात - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, September 20, 2021

पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी चरणजीत सिंह चन्नी गुरुद्वारात

https://ift.tt/3kortMn
चंदीगड : यांच्या राजीनाम्यानंतर आज पंजाबच्या घेणार आहेत. आज सकाळी ११ वाजता राजभवनात या शपथविधी सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. या कार्यक्रमात काँग्रेसचे माझी अध्यक्ष आणि खासदार हेदेखील सहभागी होणार आहेत. पदाची शपथ घेण्यापूर्वी आज चरणजीत सिंह चन्नी यांनी सकाळीच आपल्या विधानसभा मतदारसंघातील रुपनागरच्या गुरुद्वारात जाऊन आशीर्वाद घेतले. पंजाबच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचणारे चरणजीत सिंह चन्नी हे अनुसूचित जातीतील पहिलेच ठरत आहेत. चन्नी यांची निवड हा काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक मानला जातोय. अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणूक २०२२ साठी अनुसूचित जाती - जमातीतील नागरिकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा हा काँग्रेसचा प्रयत्न समजला जातोय. चन्नी यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्रीही नेमले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. यामध्ये जट शीख समाजाशी संबंधित सुखजिंदर रंधावा आणि आणखी एखाद्या हिंदू चेहऱ्याचा समावेश असू शकतो. विजय सिंगला, भारत भूषण आणि ब्रह्म मोहिंद्रा यांच्या नावाचीही उपमुख्यमंत्रीपदासाठी चर्चा सुरू आहे. चन्नी हे चमकौर साहिब विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. उल्लेखनीय म्हणजे, राज्यातील सर्वात कमी वयाचे ते मुख्यमंत्री ठरत आहेत. पंजाबचे नवनियुक्त मुख्यमंत्री चरणजीत सिंह यांच्या शपथविधी सोहळ्यात माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह सहभागी होणार का? याकडे अनेकांचं लक्ष लागून आहे.